नाशिक : शहरात दुचाकी चोरी करणार्या सराईत गुन्हेगारास इंदिरानगर पोलिसांनी वर्षभरासाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे. आदित्य राजेंद्र घुमरे (19, रा. आनंदनगर, पाथर्डी फाटा) असे तडीपार केलेल्याचे नाव आहे.
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्यविरोधात अंबड, सातपूर, इंदिरानगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी चोरी प्रकरणी पाच गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे इंदिरानगर पोलिसांनी आदित्यविरोधात तडीपारीचा प्रस्ताव पोलिस उपआयुक्त विजय खरात यांना सादर केला. त्यानुसार आदित्य यास वर्षभरासाठी तडीपार केले असून, त्यास नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात सोडले आहे. इंदिरानगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांबळे, उपनिरीक्षक ए. व्ही. उघडे, अंमलदार प्रभाकर पवार, दत्तात्रय गवारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.