संजय दत्त @62 years : नायक नहीं खलनायक हूँ मैं….

संजय दत्त
संजय दत्त
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : संजय दत्त २९ जुलैला ६२ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याची प्रोफेशनल लाईफ शानदार आहेच. परंतु,  संजय दत्त याच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच चढ-उतार आले.

अधिक वाचा –

संजयने मान्यता दत्तशी लग्न करण्यापूर्वी रिया पिल्लईशी लग्न केलं होते.

पहिले लग्न १९८७ मध्ये अभिनेत्री रिचा शर्माशी केले होते.

रिचाने संजयसाठी आपले सिनेकरिअर सोडून दिले होते. परंतु, मीडिया रिपोर्टनुसार, दोघांच्या लव्हस्टोरीला ब्रेक लागला. रिचाला ब्रेन ट्युमर झाला होता.

अधिक वाचा – 

रिचा उपचारासाठी अमेरिकेला गेली होती. तीन वर्षे ती तेथेच राहिली होती. उपचारानंतर ती भारतात परतली. त्यावेळी संजयचे माधुरीशी अफेअर सुरू आहे. असे तिला समजले.

रिचाने एका मुलाखतीत म्हटले होते. मला वाटतं की, संजयने माझ्या आयुष्यात परत यावे. आम्ही दोघे दीर्घकाळ एकमेकांपासून वेगळे राहत आहोत. मी संजयला विचारले होते की, त्याला घटस्फोट घ्यायचा आहे का?

अधिक वाचा – 

त्याने म्हटलं होतं की नाही. मलाही घटस्फोट घ्यायचा नव्हता. काहीही असो माझे त्याच्यावर प्रेम आहे. मी नेहमीच त्याच्यासोबत असेन.

रिचा आपला संसार टिकवण्यासाठी प्रयत्न करत राहिली. तिला पुन्हा ट्यूमर झाल्याचे समजले. रिचा पुन्हा न्यू-यॉर्कला गेली. अखेर दोघांना घटस्फोट घ्यावा लागला.

संजय दत्तची मेव्हणी एना एका मुलाखतीत म्हणाली हहोती. आपल्या बहिणीचा संसार तुटण्यामागे माधुरी जबाबदार आहे. असे तिने म्हटले होते.

संजय दत्त
संजय दत्त

आमचे नाते तुटण्यामागे रिचाची बहिण एना जबाबदार 

एका मुलाखतीत संजयने म्हटले होते. – 'रिचाच्या आजारपणामुळे आमचा संसार मोडला नाही.

मी असा व्यक्ती नाही. तिचे केस गळत आहेत. म्हणून मी तिला कधीच सोडून दिले नव्हते.

रिचासोबत माझे नाते संपुष्टात आले आहे.

आता आम्ही एकत्र येऊ शकत नाही. रिचाचे पालक आमच्या आयुष्यात खूपच लक्ष देत होते. ते माझ्यावर काही ना काही आरोप करत असतं.

आमचे नाते तुटण्यामागे रिचाची बहिण एना होती. आमच्या दोघांमध्ये ती गैरसमज पसरवत असे.'

संजय म्हणाला होता, 'जेव्हा तिला कॅन्सर नव्हता, त्यावेळी ती सर्वांना सांगत असे – मला भारतात राहायचं नाही.

न्यूयॉर्कमध्ये माझे वडील आहेत. ती मला नेहमी म्हणायची.

तुझे काम मला अजिबात आवडत नाही. तू रात्री १० वाजेपर्यंत काम का करतोस. ८ वाजेपर्यंत घरी का येत नाहीस.

तिनेदेखील एक अभिनेत्री म्हणून काम केलं होतं. तिला माहिती आहे की, चित्रपट इंडस्ट्रीत कसं काम असतं. लोकांना वाटतं की, तिच्या आजारपणामुळे आमचं नातं संपलं.'

– 'खलनायक' ते 'मुन्ना भाई एमबीबीएस' यासारखे चित्रपट केले.  त्याने आर्म्स ॲक्ट अंतर्गत ४२ महिने तुरूंगात शिक्षा भोगली. २५ फेब्रुवारी, २०१६ रोजी तो तुरूंगातून सुटला होता.

संजय दत्तने बाल कलाकार म्हणून सिनेकरिअरची सुरुवात केली होती. वडील सुनील दत्ता यांच्या बॅनर अंतर्गत चित्रपट 'रेशमा और शेरा'मध्ये काम केलं होतं.

– १९८१ मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'रॉकी'मध्ये संजय मुख्य भूमिकेत होता. दमदार दिग्दर्शन, पटकथा आणि गीत-संगीतामुळे चित्रपट सुपरहिट ठरला.

दुर्दैवाने हा चित्रपट रिलीज होण्याआधी त्याची आई, अभिनेत्री नर्गिस दत्त यांचे निधन झाले.

– आईच्या मृत्यूनंतर संजय ड्रग्जच्या आहारी गेला. त्यामुळे अनेक चित्रपट त्याच्या हातातून गेलं. पण, वडील सुनील दत्त यांनी अमेरिकेला एका नशामुक्ती केंद्रात त्याला उपचारासाठी पाठवले.

– मुंबई बॉम्ब स्फोटावेळी त्याच्यावर आरोप झाला. शस्त्रास्त्रे बाळगल्या प्रकरणात अटक झाली. पण, चित्रपट 'खलनायक' रिलीज होण्याआधी त्याला अटक झाली होती.

– कदाचित खूप कमी लोकांना हे माहिती आहे. तुरूंगात असताना तो आरजे म्हणून काम करत होता. तेथे तो हिंदी, इंग्रजी आणि मराठीत अनाउंसमेंट करत होता.

अधिक वाचा – 

पाहा व्हिडिओ – "हे विठु राया आता कोरोना संपू दे आणि शाळा सुरु होउदे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news