पुढारी ऑनलाईन : 'किंग खान' शाहरूखचे आलिशान महालासारखे घर 'मन्नत' देश-विदेशातील त्याच्या चाहत्यांच्या कुतुहलाचा विषय असते. सध्या त्याचे हे घर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे शाहरूखने त्याच्या बंगल्याची नेमप्लेट बदलली आहे.
आता बसवलेल्या या नव्या, उभ्या नेमप्लेटने लोकांचे लक्ष वेधून घेतले. या नव्या नेम प्लेटचे डिझाईन त्याची पत्नी गौरी खानने केले आहे. या प्लेटची किंमत सुमारे 20 ते 25 लाख रुपये आहे. शाहरूखच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे तर यापूर्वी तो 'झीरो' मध्ये दिसला होता. आता त्याचा 'पठाण' चित्रपट येतो आहे. याशिवाय नयनतारा आणि सान्या मल्होत्रासमवेतही तो एक चित्रपट करतो आहे. राजकुमार हिरानी यांच्या 'डंकी' मध्येही शाहरूख झळकणार आहे.