इन्स्टा पोस्टसाठी प्रियांका घेते ‘इतके’ पैसे | पुढारी

इन्स्टा पोस्टसाठी प्रियांका घेते 'इतके' पैसे

पुढारी ऑनलाईन : इंन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करण्यासाठी बॉलीवूडमध्ये सर्वाधिक पैसे कोण घेतं हे माहिती आहे का? या बाबतीत प्रियांका चोप्रा अव्वल स्थानी आहे. तिचे 75 दशलक्ष फॉलोअर्स असून एका पोस्टसाठी ती 3 कोटी रुपये घेते. तिच्यानंतर करिना कपूरचा क्रमांक लागतो. ती एका पोस्टसाठी दोन कोटी रुपये घेते. दीपिका पदुकोन एका पोस्टसाठी दीड कोटी, अक्षय कुमार 1 कोटी, श्रद्धा कपूर 1.18 कोटी, कॅटरिना कैफ 1 कोटी, आलिया भट्ट 1 कोटी, अनुष्का शर्मा 95 लाख, शाहरूख खान 80 लाख, अमिताभ बच्चन 50 लाख, रणवीर सिंह 50 लाख आणि शाहिद कपूरही 50 लाख रुपये घेतो.

सेलिब्रिटींमध्ये याबाबतीत सर्वात अव्वल स्थानी आहे क्रिकेटपटू विराट कोहली. तो एका पोस्टसाठी तब्बल 5 कोटी रुपये घेतो. प्रियांका चोप्राचे देश-विदेशात असंख्य चाहते आहेत. तिच्या प्रत्येक फोटोबाबत लोकांना उत्सुकता असते व ती सोशल मीडियात चांगली सक्रियही असते. एक आंतरराष्ट्रीय स्टार असलेली प्रियांका इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी तब्बल तीन कोटी रुपये घेते!

राणा दांपत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल का झाला? सांगत आहेत सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत

Back to top button