पूजा सावंत हिची चिखलदरा हिल स्टेशनवर भटकंती

पूजा सावंत हिची चिखलदरा हिल स्टेशनवर भटकंती
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन: 'क्षणभर विश्रांती' फेम आणि मराठी अभिनेत्री पूजा सावंत नेहमी सोशल मीडियावर अॲक्टिव्ह असते. ती नेहमी आपले फोटो आणि वेगवेगळे व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते. पूजा सावंत हिने असेच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ती थंड हवेच्या ठिकाणी म्हणजेच चिखलदरा हिल स्टेशनवर सुट्ट्यांचा आनंद घेताना या फोटोमध्ये दिसत आहे.

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे पूजा सावंत गेली होती. तेथील ती मनमुराद सौंदर्याचा आनंद लुटत आहे. चिखलदरा हे थंड हवेसाठी प्रसिध्द आहे.

चिखलदरा येथील फोटो शेअर

या खास क्षणांचे सुंदर फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये पूजाने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स घातलेली दिसतेय. यासोबत तिने निळ्या रंगाचा शर्ट कमरेवर लपेटला आहे.

पूजा सावंत यावेळी खूपच आनंदी, उत्साही आणि ग्लॅमरस दिसत आहे. हे फोटो व्हायरल होताच अनेक चाहत्यांनी कमेंन्टस केल्या आहेत.

यात एका युजरने 'खूपच ग्लॅमरस आहेस' तर दुसऱ्या युजरने 'आशा आहे की, तुम्हाला अमरावती येथील लॉज आणि वांग्याची भजी नक्की आवडेल' असे लिहिले आहे.

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहऱ्यापैकी एक म्हणून पूजा सावंत ओळखली जाते. तिने अनेक मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

पूजा सावंतने 'क्षणभर विश्रांती' या मराठी चित्रपटातून पहिल्यांदा पदार्पण केले आहे. यानंतर पुजाने 'आता गं बया', 'झकास', 'सतरंगी रे', 'दगडी चाळ', 'निळकंठ मास्तर' अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केले आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news