

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या सोशल मीडियावर 'बचपन का प्यार' या गाण्याचा ट्रेंड जोरात सुरु आहे. बॉलिवुड सेलिब्रिटीसह मराठी कलाकार इन्स्टाग्रामवर रील्स बनवत आहेत. यात आज मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर नेही एक व्हिडीओ बनवला आहे. यात ती तिच्या मुलासोबत दिसत आहे. तिने हा व्हिडीओ इन्स्टाग्रावर शेअर केला आहे.
धनश्री काडगावकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. अभिनेत्री धनश्री काडगावकर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून वहिनीसाहेब ही भूमिका साकारत घराघरात पोहचली आहे. आई होणार असल्याने धनश्रीने मालिकेतून ब्रेक घेतला. धनश्री काडगावकरने मुलाला जन्म दिला आहे. त्याचं नाव कबीर असं आहे.
तिने काही तासांपूर्वी लाडक्या मुलासोबत 'बचपन का प्यार' गाण्यावर धमाल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत धनश्रीचा मुलगा मुलगा कबीर गोड दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये "बचपन का प्यार…हे तर करायचंच होतं" असं लिहिल आहे.
या व्हिडीओला अनेकांनी पसंती दिली आहे. तर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
धनश्रीने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत राणाच्या वहिनीचे कॅरेक्टर केले आहे. यातून ती घराघरात 'वहिनी' या नावाने प्रसिध्द झाली आहे.
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील छिंदगढ येथील रहिवासी असलेल्या सहदेव यी पाचवीत शिकणाऱ्या मुलाने 'बचपन का प्यार' हे गाणे त्याच्याच आवाजात गायले आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो स्टार बनला आहे. काही दिवसांपूर्वी तो बॉलिवूड गायक आणि रॅपर बादशाहसोबत दिसला होता.
दोन वर्षांपूर्वी नक्षल प्रभावित भागातील पेंडलनार शाळेत पाचव्या वर्गात शिकत असताना 26 जानेवारीच्या तयारीदरम्यान हे गाणे सहदेव याने गायले होते आणि दोन वर्षांनंतर हे गाणे इतके व्हायरल झाले की तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. सहदेवने गायलेल्या बालपणीच्या प्रेमावर इंस्टाग्रामवर लाखो रील बनवण्यात आल्या आहेत. मोठ मोठे सेलिब्रिटी सहदेवच्या गाण्यांवर रील बनवत आहेत.