Android : सावधान! एंड्रॉईड मोबाईल वापरताय? तर ही बातमी नक्की वाचा | पुढारी

Android : सावधान! एंड्रॉईड मोबाईल वापरताय? तर ही बातमी नक्की वाचा

पुढारी ऑनलाईन डेस्क : एंड्रॉईड (Android) मोबाईल वापरत आहात का? असाल, तर ही बातमी नक्की वाचा. कारण, एंड्रॉईडमध्ये एक धोकादायक मालवेअर (Malware) आढळला आहे. तो तुमच्या डिव्हाईसमधील डेटा चोरी करू शकतो, असं सेक्युरिटी एक्स्पर्टनी सांगितलं आहे.

या मालवेअरचं Vultur असं नाव आहे. जो तुमच्या स्क्रिनवर दिसणारी प्रत्येक माहिती रेकॉर्ड करतो. ही महत्वाची बाब लक्षात घ्या की, लॉगइन, पासवर्ड, इंटरनेट हिस्ट्री, बँक डिटेल्स, मेसेज, सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्हिटी अशा सर्व गोष्टी हा मालवेअर रेकॉर्ड करू शकतो.

समोर आलेल्या माहितीनुसार Vultur एक बँकिंग ट्रोजन आहे. याचाच अर्थ तो बँक डिटेल्स चोरी करणारा मालवेअर आहे. पण, हा इतर बँकिंग ट्रोजनहून अतिशय वेगळा आहे.

अन्य मालवेअर युजर्सकडून बनावट वेबसाईटद्वारे अकाउंट डिटेल्स भरून घेतली जातात आणि नंतर चोरी करतात. मात्र, Vultur मालवेअर थेट युजर्सच्या डिव्हाईस स्क्रिनला रेकॉर्ड करून अकाउंटची माहिती चोरी करतो.

त्यामुळे एंड्राईड (Android) युजरने अधिकृत साईटवर लॉगइन केलं, तरी डिटेल्स चोरी होऊ शकतात. मोबाईल सिक्योरिटी वेबसाईट Threat Fabric च्या तज्ज्ञांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं, की हा मालवेअर यावर्षी मार्चमध्ये समोर आला. हा मालवेअर गुगल प्ले स्टोरवर असलेल्या एका अ‍ॅपद्वारे पसरला आहे.

जो आतापर्यंत अनेकांकडून डाऊनलोडही करण्यात आला आहे. प्रोटेक्शन गार्ड असं या अ‍ॅपचं नाव आहे. सध्या हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून हटवलेलं आहे.

पहा व्हिडीओ : कोकणी खेकडा फ्राय रेसिपी माहीत आहे का ?

हे वाचलंत का?

Back to top button