राजस्‍थान : ‘ईयरफोन’चा कानात स्‍फोट, तरुणाचा मृत्‍यू | पुढारी

राजस्‍थान : 'ईयरफोन'चा कानात स्‍फोट, तरुणाचा मृत्‍यू

जयपूर (राजस्‍थान) ; पुढारी ऑनलाईन :   ब्‍ल्‍यू टूथ ‘ईयरफोन’ चा कानात स्‍फोट झाल्‍याने एका तरुणाचा मृत्‍यू झाल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. राकेश नागर (वय २८) असे मृताचे नाव आहे.  राकेश हा कानात ब्‍लूटूथ ‘ईयरफोन’ घालून बोलत असताना ही दुर्घटना झाली.

राजस्‍थानच्या जयपूर जिल्‍ह्यातील उदयपुरिया गावात (शुक्रवार) ही घटना घडली. जयपूर-सीकर महामार्गावरील गावात ही घटना घडली.राकेश नागर  कानात ब्‍लू टूथइयरफोन घालून बोलत होता.

यावेळी अचानक मोठा आवाज होवून ब्‍लूटूथचा त्‍याच्या कानातच स्‍फोट झाला. यामध्ये राकेश जखमी झाला.

स्‍फोटाच्या आवाजाने त्‍याचे नातेवाईक राकेशजवळ धावले. ताे गंभीर जखमी झाला होता.

या घटनेनंतर राकेशच्या नातेवाईकांनी त्‍याला त्‍याच अवस्‍थेत जवळच्या रूग्‍णालयात नेले. या ठिकाणी डॉक्‍टरांनी त्‍याला मृत घोषित केले.

रूग्‍णालयातील डॉ. एलएन रूंडल यांनी सांगितले की, राकेशचा मृत्‍यू हृदयविकाराच्‍या झटक्‍याने झाला आहे.

डॉक्‍टरांच्या म्‍हणण्यानुसार अचानक ब्‍लुटूथचा कानात स्‍फोट झाल्‍याने राकेशला हद्यविकाराचा झटका आला.

यामध्येच त्‍याने प्राण सोडले.या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्‍थळी पोहोचले.

यावेळी नातेवाईकांनी राकेश हा नेहमी ब्‍लूटूथवरूनच बोलायचा आणि नेहमी कानात ब्‍लूटूथ घालून तो गाणी ऐकायचा असे सांगितले.

फोनवर जास्‍त काळ बोलत राहिल्‍याने मोबाईल फोन गरम होउन स्‍फोट झाल्‍याच्या घटना या आधी घडल्‍या आहेत,

मात्र ब्‍लूटूथचा स्‍फोट होवून एखाद्याचा मृत्‍यू होण्याची ही प्रथमच घटना असल्‍याचे मानले जात आहे.

त्‍यामुळे कोणत्‍याही गॅझेटचा वापर करताना काळजी घेणं गरजेचं आहे.

ईयर फोन चांगल्‍या दर्जाच्या घेण गरजेचं आहे. तसेच त्‍याचा वापरही जपून करण आवश्यक असल्‍याचे डाॅक्‍टरांनी स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ : कोकणी खेकडा फ्राय रेसिपी माहीत आहे का?

Back to top button