अनुष्का शर्मा : बिनवासाचा साबण!

अनुष्का शर्मा : बिनवासाचा साबण!

पुढारी ऑनलाईन : मोहक चेहर्‍याच्या अनेक अभिनेत्री साबणाच्या जाहिराती करीत असताना दिसून येत असतात. आकर्षक रंगाचे आणि सुगंधी साबण आपले सौंदर्य कसे वाढवतात हे त्या लडिवाळपणे अशा जाहिरातींमधून सांगत असतात. मात्र, सध्या अनुष्का शर्मा हातात एक असा साबण घेऊन उभी असताना दिसते की जो अजिबात आकर्षक नाही, शिवाय त्याला सुगंधही नाही. हा साबण कुठल्या कंपनीचा नसून तो रणवीर सिंह याने तिला भेट म्हणून दिलेला आहे.

अनुष्काने आणि तिच्या सर्व कुटुंबीयांनी हा बिनवासाचा साबण वापरावा, असे रणवीरने म्हटले आहे. हा सर्व प्रकार त्याच्या आगामी 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग आहे. चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रसिद्ध होत आहे. ते जाहीर करण्यासाठी रणवीरने हा अनोखा मार्ग अवलंबला. त्याने आपली मैत्रीण अनुष्काला हा साबण भेट म्हणून दिला व एक लांबलचक पत्रही लिहिले.

या खास भेटीबरोबरचा फोटो अनुष्काने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 'जयेशभाई जोरदारच्या बिनवासाच्या साबणाने आणि विशेष पत्राने मला उत्साहित केले आहे. ट्रेलरमधून काय समजणार आहे याबाबत मी उत्सुक आहे' असे तिने म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news