

प्रसिद्ध युट्यूबर Anurag Dobhal उर्फ UK07 Rider याचा एक भावनिक लाईव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो रडताना आणि अत्यंत तणावाखाली दिसत असल्याने चाहत्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली. या घटनेनंतर त्याच्या प्रकृतीबाबत काही अपडेट्स समोर आल्या आहेत.
YouTuber The UK07 Rider Anurag Dobhal car crash
लाईव्ह स्ट्रीमिंग करत यूट्यूबर उर्फ UK07 Rider उर्फ अनुराग डोभालने (YouTuber Anurag Dobhal) आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत कारचा अपघात होऊन तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बिग बॉस फेम यूके रायडर उर्फ अनुराग डोभालने आपले जीवन संपवण्याच्या प्रयत्न केल्यानंतर अनेक टीव्ही सेलिब्रिटीजने यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही घटना शनिवारी रात्री झाली. आता त्याच्या मॅनेजरने त्याच्या तब्येतीबद्दल अपडेट्स दिले आहेत.
अनुराग डोभाल हा बाइकिंग आणि ट्रॅव्हल व्लॉग्समुळे तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याच्या ‘UK07 Rider’ या यूट्यूब चॅनेलवर लाखो सबस्क्राइबर्स आहेत. त्याचे बाईक राईडिंग, ट्रॅव्हल आणि लाइफस्टाईलशी संबंधित व्हिडिओ नेहमीच मोठ्या प्रमाणात पाहिले जातात.
नेमकं काय घडलं?
रिपोर्टनुसार, बिग बॉस सीजन १७ फेम यूट्यूबर यूके 07 रायडर उर्फ अनुराग डोभालने शनिवारी रात्री गाजियाबादमध्ये १५० च्या गतीने कार चालवली. दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर अनुरागने इन्स्टाग्राम लाईव्ह केलं. तो फॉर्च्यूनर कारमध्ये होता. इन्स्टाग्राम लाईव्हवर लाल डोळे आणि तराळलेले अश्रू.. तो म्हणतो "आणि मला आशा आहे...जर मी माझ्या पुढच्या आयुष्यात परत आलो तर, मम्मी, मला फक्त प्रेम दे, फक्त प्रेम दे, बाबू. मला खरोखर प्रेमाची गरज होती." यावेळी त्याच्या गाडीचा अपघात झाला आणि कार ५ वेळा पलटली.
अनुराग डोभालची प्रकृती कशी आहे?
अनुरागच्या मॅनेजरने सोशल मीडियावर स्टेटमेंट जारी केलं. त्यांनी लिहिलं-'मी यूके रायडर टीमकडून अनुराग यांचा मॅनेजर आहे आणि मी हे कन्फर्म करतो की, अनुराग हॉस्पिटलमध्ये आहे. आणि विनंती करतो की, हे ऑफिशियल स्टेटमेंट प्रमाणेच घ्यावे, या परिस्थितीत सातत्याने कॉल करू नये. आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू.'
त्यांनी पुढे लिहिलं- 'अनुराग यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. सध्या तो आयसीयुमध्ये आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही डॉक्टर्सच्या संपर्कात आहोत. जे लोक आम्हाला पाठिंबा देत आहेत, त्यांचे आभार. त्या खास लोकांचे आभार , ज्यांनी अनुरागचे लोकेशन शोधण्यासाठी मदत केली. खरंच तुम्ही परमेश्वर आहात आमच्यासाठी.'
अली गोनी म्हणाला-
यूकेमधील रायडरच्या घटनेवर अली गोनीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर क्लिप शेअर करताना तो म्हणाले, "त्या व्यक्तीने स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे ते सर्व उघड केले आहे. कौटुंबिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका, परंतु त्या व्यक्तीने स्वतःला त्याच्या चाहत्यांसमोर उघड केले आणि त्याला बदल्यात काय दिले? हास्य, विनोद, ट्रोलिंग." अलीने पुढे म्हटले की, "मला आशा आहे की तुम्ही ठिक आहात."
प्रिन्स नरुला ट्रोलर्सवर भडकला
प्रिन्स नरुलाने अनुराग डोभालला ट्रोल करणाऱ्यांवर टीका केली. तो म्हमाला, "कधीकधी, लोकांना सत्य सांगण्यासाठी, मी प्रामाणिक आहे, एखाद्याला स्वतःचे जीवन बलिदान द्यावे लागते, मरावे लागते. अन्यथा, लोक ते विनोद म्हणून घेतात आणि फक्त ट्रोल करतात. म्हणूनच मी म्हणतो की मला ट्रोलर्सचा तिरस्कार आहे. तुम्हाला कोणाचीही परिस्थिती समजत नाही. लोक अजूनही विचारत आहेत की तो मेला आहे की नाही? तो अजूनही जिवंत आहे? त्याची परिस्थिती, तो कोणत्या परिस्थितीत आहे हे कोणीही समजत नाही."