

साऊथ सुपरस्टार विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपबद्दलच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. विजयच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान दोघांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे. या जोडीने याआधी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते.
Thalapthy Vijay-Trisha Krishnan dating Buzz & films
थलपति विजयच्या घटस्फोटाच्या वृत्तानंतर तो आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन पहिल्यांदाच एकत्र दिसले. दोघांनीही ५ मार्च २०२६ रोजी निर्माते कल्पथी एस सुरेश यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये पहिल्यांदाच एकत्र हजेरी लावली. दरम्यान, विजयची पत्नी संगीता सोर्नालिंगमने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तिने विजयवर विवाहबाह्य संबंधाचा आरोप लावला आहे. विजयचे एका अभिनेत्रीशी अफेअर असल्याचे संगीता म्हटले आहे. दुसरीकडे, विजय आणि त्रिशाच्या डेटिंगची चर्चा रंगली आहे. हे पहिल्यांदाच चर्चा झालेली नाही. याआधीही अनेकदा त्रिशा-विजयच्या अफेअरची चर्चा झालेली दिसते.
मिरर सेल्फीने पुन्हा डेटिंगची चर्चा
लिफ्टमधील अभिनेता थलपति विजय सोबत सेल्फी फोटो शेअर केल्यानंतर अभिनेत्री त्रिशा कृष्णन चर्चेत आली होती. तिने विजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एका लिफ्टमधील सेल्फी सोशल मीडियावर शेअर केली होती.
गोव्यातील फोटोंनी रंगली होती अफेअरची चर्चा
थलपति विजय आणि त्रिशा कृष्णन एका लग्नासाठी एकत्र प्रवास करताना स्पॉट झाले होते. खासगी विमानतळावरील त्यांचे हे फोटो होते. दोघेही सकाळच्या वेळेला एका खासगी जेटने गोव्याला पोहोचल्याचे म्हटले गेले. त्यावेळचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता.
त्रिशा-विजयचे एकत्र अभिनय आणि हिट झालेले चित्रपट
गिल्ली (Ghilli)
तमिळ, तेलुगुसह हिंदी चित्रपटांमध्ये मोठेनाव कमावणारी अभिनेत्री म्हणून त्रिशाचं नाव आहे. विजय - त्रिशाने २००८ मध्ये गिल्ली चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. स्पोर्ट्स ड्रामा गिल्ली इतका हिट झाला होता की, पुन्हा रि-रिलीज करण्यात आला होता. त्रिशा धनलक्ष्मीच्या भूमिकेत तर विजय वेलूच्या भूमिकेत होता. तर खलनायक म्हणून प्रकाश राज होते.
आथी (Aathi)
हा चित्रपट एक ॲक्शन थ्रिलर होता. विजय आथीच्या भूमिकेत होता. तो आपल्या खऱ्या आई-वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी चेन्नईमध्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेतो. तिथे तो अंजली म्हणजेच त्रिशा कृष्णनला भेटतो आणि प्रेम करू लागतो.
थिरुपाची (Thirupaachi)
विजय-त्रिशाचा हा दुसरा चित्रपट होता. सिवागिरीच्या भूमिकेत विजयने धुमाकूळ घातला होता. तो एका गावात लोहार असतो. तो आपल्या बहिणीला भेटायला चेन्नईला जातो. तिथे त्रिशाला पाहतो आणि प्रेमात पडतो. त्रिशाने यामध्ये सुभाची भूमिका साकारली होती.
कुरुवी (Kuruvi)
धरणी दिग्दर्शित चित्रपटात विजय-त्रिशाने अनुक्रमे वेत्रिवेल आणि देवीची भूमिका साकारली होती. वेत्रिवेल नावाचा एक कार रेसर असतो. त्याला माहिती होते की, मलेशियातील एका डॉनने त्याच्या वडिलांना खूप मोठी रक्कम देणे आहे. डॉनला भेटल्यानंतर, त्याला कळते की त्याचे हरवलेले वडील अजूनही जिवंत आहेत आणि त्यांना बंदिवासात ठेवले आहे.
द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम (The Greatest of All Time)
व्यंकट प्रभू दिग्दर्शित द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईममध्ये दोघेही झळकले होते. विजय आणि मीनाक्षी सोबत, चित्रपटात जयराम, स्नेहा, लैला, योगीबाबू, व्हीटीव्ही गणेश, अजमल अमीर, माईक मोहन, वैभव, प्रेमगी, अजय राज आणि अरविंद आकाश यासह अन्य तगडे सहाय्यक कलाकार आहेत.
लिओ (Leo)
विजय आणि त्रिशा हे एका कपलच्या भूमिकेत होते. ते आपल्या मुलासह हिमाचल प्रदेशात राहतात. विजयने पार्थिवनची भूमिका साकारलीय. ड्रग्ज कार्टेलच्या मार्गात पार्थिनव येतो, तेव्हा कथा एक वेदनादायक वळण घेते.
त्रिशा कृष्णन विषयी जाणून घ्या..
- १९९९ मध्ये तिने मिस चेन्नईचा किताब जिंकला होता
- त्यानंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश केला
- सॅक्रेड हर्ट मॅट्रीक्युलेशन स्कूल इन चर्चमधून शिक्षण घेतले
- पुढे इथिराज कॉलेज ऑफ वूमन (चेन्नई) येथून बीबीएची पदवी घेतली