Youtuber Anurag Dobhal big health update | भीषण अपघातानंतर आयसीयुमध्ये ‘UK07 Rider’, मॅनेजरनी दिली महत्त्वाची माहिती

अपघातानंतर ‘UK07 Rider’ अनुराग डोभालची प्रकृती कशी आहे? मॅनेजरने केला मोठा खुलासा
Youtuber Anurag Dobhal
Youtuber Anurag Dobhal big health updateinstagram
Published on
Updated on
Summary

लोकप्रिय यु-ट्यूबर अनुराग डोभालचा गंभीर अपघात झाल्याची बातमी समोर आली होती. अपघातानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तो आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मॅनेजरने त्याच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.

Youtuber Anurag Dobhal big health update

लोकप्रिय यु-ट्यूबर अनुराग डोभालच्या कारचा भीषण अपघात झाल्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या रुग्णालयात तो आयसीमध्ये दाखल असून उपचार घेत आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या मॅनेजरने महत्त्वाची माहिती दिली आहे. या घटनेमुळे चाहत्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

Admin

UK07 Rider नावाने प्रसिद्ध यूट्यूबर अनुराग डोभाल सध्या आयसीयमध्ये आहे. गुरुवारी काही वेळासाठी त्याला आयसीयूतून बाहेर काढण्यात आलं होतं. इन्स्टाग्राम लाईव्ह दरम्यान कार क्रॅश झाली आणि गाडी तब्बल पाच वेळा पलटली होती. या भीषण घटनेनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्याचा मॅनेजर रोहित पांडे यांनी त्याच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे.

अनुरागची प्रकृती गंभीर मागील रविवारी अनुराग डोभालने चालत्या कारमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. गाडीचे स्पीड इतके वाढवलेले होते की, गाडी ५ वेळा पलटी झाली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. मागील ७ दिवसांपासून तो रुग्णालयात आहे. आज शनिवारी सका‍ळी अनुरागच्या मॅनेजरनी त्याची तब्येत गंभीर असल्याचे सांगितले.

Youtuber Anurag Dobhal
Aamir Khan | त्या काळात प्रमोशनसाठी साधने नव्हती..खुद्द आमिर-जुहीने रस्त्यावर उतरून वाटले होते 'कयामत से कयामत तक'चे पोस्टर्स

मॅनेजर रोहित यांनी लिहिलं-अनुराग यांची प्रकृती सकाळपर्यंत स्थिर होता. पण आता नाजूक आहे. त्याची प्रकृती बिघडत चालली आहे. आपघताता फुफ्फुसांना हानी पोहोचली आहे. त्यामुळे गंभीर इंफेक्शन झालं. आणि त्यांना सीवियर निमोनिया झाला. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सर्वांना विनंती आहे की, त्याच्यासाठी प्रार्थना करावी.

Youtuber Anurag Dobhal
Aishwarya Narkar|'नाही तर तुमच्यासारखेच होणार मोठे होऊन', शॉर्ट कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरचा जोरदार पलटवार

गुरुवारी अनुरागला आयसीयूतून बाहेर काढल्यानंतर रोहित यांनी त्याचा एक फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये अनुराग बेडवर हसताना पीस साईन दाखवत होते. फोटो कॅप्शन लिहिली होती-अनुराग भाई आयसीयूतून बाहेर आहे. आम्ही 24x7 त्याच्यासोबत आहोत. लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news