Aishwarya Narkar|'नाही तर तुमच्यासारखेच होणार मोठे होऊन', शॉर्ट कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरचा जोरदार पलटवार

Aishwarya Narkar on troller | नाही तर तुमच्यासारखेच होणार मोठे होऊन..' शॉर्ट कपड्यांवरून बोलणाऱ्या ट्रोलरला ऐश्वर्याची दणादण सडेतोड उत्तरे
Aishwarya Narkar
Aishwarya Narkar answered to trollerpudhari photo
Published on
Updated on
Summary

मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने शॉर्ट कपडे घातल्यामुळे ट्रोल करणाऱ्या एका सोशल मीडिया युजरला दिलेले सडेतोड उत्तर सध्या चर्चेत आहे. त्या ट्रोलरने केलेल्या कमेंटला ऐश्वर्याने खणखणीत शब्दांत प्रत्युत्तर दिले. तिच्या या स्पष्ट आणि निर्भीड प्रतिक्रियेचे अनेकांनी समर्थन केले असून सोशल मीडियावर तिच्या उत्तराची जोरदार चर्चा सुरू आहे.

Aishwarya Narkar on troller

मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सध्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. त्यांच्या कपड्यांवरून केलेल्या एका ट्रोलिंगला त्यांनी दिलेल्या सडेतोड उत्तरामुळे ही चर्चा अधिक रंगली आहे.

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. वैयक्तिक आयुष्यातील अनेक क्षण, फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडेच तिने काही फोटो पोस्ट केले होते. त्या फोटोंमध्ये ती योगासने करताना दिसली. यावेळी शॉर्ट कपडे घातल्याने तिला एका सोशल मीडिया युजरने ट्रोल केले.

सोशल मीडिया युजरने त्यांच्या या फोटोंवर कमेंट करत टीका केली. त्या युजरने त्यांच्या कपड्यांबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया दिली. यावर ऐश्वर्याने शांत बसण्याऐवजी त्याला थेट आणि ठाम उत्तर दिले.

नेमकं काय घडलं?

ऐश्वर्या नारकरने योगासन करताना एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओवर त्याने विचित्र कमेंट केली. त्यावर ऐश्वर्याने असं उत्तर दिलं की, त्याची चर्चा होताना दिसतेय.

शॉर्ट कपडे घालून व्ह्डिओ बनवता या टीकेवर ऐश्वर्या म्हणाली- मुद्दा व्यायामाचा आहे. कोणी काय कपडे घालावेत हा व्ययक्तीगत प्रश्न आहे. तुमच्या स्टेटमेंटवरून अक्कल कळतेच आहे. सोशल मीडिया युजर म्हणाला- कोणते कपडे घालायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुमच्या अशा कपड्यांमुळे लहान मुले बिघडतात, त्याचं काय करायचं?

यावर ऐश्वर्याने सडेतोड उत्तर दिलं की- त्यांना व्यायाम करायला शिकवा. म्हणजे विचारांचा समतोल येईल आणि डोकं शाबूत राहिल..नाहीतर तुमच्यासारखेच होणार मोठे होऊन..काय बोलताय...असे म्हणत तिने स्माईल इमोजी शेअर केली. अकलेचे तारे काढणाऱ्याला ऐश्वर्याने चांगलाच चाप दिला.

आजकाल सोशल मीडियावर कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र अनेक कलाकार अशा ट्रोलर्सना ठामपणे उत्तर देताना दिसतात. ऐश्वर्या नारकर यांनीही त्याच पद्धतीने ट्रोलरला सडेतोड उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली.

त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून चाहत्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. सध्या ऐश्वर्याचे हे उत्तर इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. याआधीही ऐश्वर्या आणि तिचे पती अविनाश नारकर यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news