Yash struggle story | दिवसाला ५०० रुपये कमावणारा यश आज करोडोंचा सुपरस्टार; सांगितला संघर्षाचा थरारक प्रवास

Yash struggle story | दिवसाला ५०० रुपये कमावणारा यश आज करोडोंचा सुपरस्टार; सांगितला संघर्षाचा थरारक प्रवास
Yash
Yash struggle life story pudhari photo
Published on
Updated on
Summary

KGF स्टार यशने आपल्या संघर्षाच्या दिवसांबद्दल बोलताना अनेक भावनिक आठवणी शेअर केल्या. मुंबईत फक्त ३०० रुपये घेऊन आलेल्या यशला सुरुवातीला रंगमंचामागे काम करावे लागले. नंतर टीव्ही मालिकांमधून त्याने अभिनयाची सुरुवात केली आणि दिवसाला ५०० रुपये कमावले. स्वतःवर विश्वास ठेवून आणि मेहनतीच्या जोरावर त्याने आज सुपरस्टारपद मिळवल्याचे सांगितले.

'शाळेत तो म्हणायचा मी सुपरस्टार बनेन... अगदी तसंच झालं...जेव्हा जेव्हा वर्गात आपल्या स्वप्नांबद्दल विचारलं जायचं तेव्हा प्रत्येक जण आपापली स्वप्ने सांगायचे. पण यश म्हणायाचा, मी सुपरस्टार बनेन....'

केजीएफ स्टारची गोष्टच वेगळी आहे. सुपरस्टार यशला कोण ओळखत नाही. त्याच्या प्रत्येक चित्रपटाचा चाहता वर्ग वेगळाच आहे. ही यशाची उंची गाठायला संघर्षाचा रस्ता पार करावा लागला आहे. कर्नाटकातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या यशचे वडील बस ड्रायव्हर होते. तर आई हाऊसवाईफ होती. बालपणापासूनच यशला सुपरस्टार व्हायचं होतं. पण आर्थिक परिस्थितीत पाहून तो केवळ ३०० रुपये घेऊन बंगळुरूला पोहोचला.

केवळ ५० रुपयांसाठी तिथे थिएटरमध्ये बॅकस्टेज काम केलं. बघता बघता अभिनय शिकून घेतला आणि छोट्या-छोट्या भूमिका करू लागला. नंतर त्याला टीव्ही मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला त्याला दिवसा फक्त ५०० रुपये मिळायचे. कन्नड सिनेमामध्ये ओळख मिळाल्यानंतर केजीएफ: चैप्टर १ आणि केजीएफ: चॅप्टर २ मधून तो सुपरस्टार बनला.

एका मुलाखतीत त्याने आपला जीवन प्रवास उलगडला. यश म्हणतो की-माझा जन्म कर्नाटकच्या हासन जिल्ह्यातील गाव भुवानाहल्लीमध्ये झाला. माझे वडील मैसूरमध्ये राहत होते. एका मध्यम वर्गातून आलेलो मी अभिनेता बनण्याचे स्वप्न पाहिले. बालपणापासूनच मला अभिनय, मोनो ॲक्टिंग, फॅन्सी ड्रेस आणि डान्समध्ये भाग घेणे आवडायचे. तेथूनच माझा प्रवास सुरु झाला. अभिनय शिवाय दुसरा पर्याय नव्हता. माझ्या आयुष्याच बी-प्लॅन नव्हता. त्याचवेळी मला समजले की, अभिनेता होणे किती कठीण आहे. यासाठी किती मेहनत आणि समर्पण हवं.

यश पुढे म्हणाला की, शाळेतील शिक्षक मला हीरो म्हणून बोलवायचे. बालपणात मी एक मोनो अभिनय केला होता. ज्यामध्ये वीरप्पनला पकडण्याबद्दलचे डायलॉग होते. याच कारणामुळे शाळेत मला सगळे चिढवायचे. जेव्हा देखील वीरप्पनची लेटेस्ट अपडेट न्यूज समोर यायची. लोक मजेत म्हणायचे, “अरे, अजून पकडला गेला नाही का?”

मला एखादे अभिनय इन्स्टीट्यूट शिकायचं होतं. पण माझे आई-वडील खूप घाबरले होते. त्यांना वाटत होतं की, चित्रपट इंडस्ट्री सहज सोपी गोष्ट नाही. तिथे यश मिळणं फार कठीण आहे. दहावी इयत्तेनंतर मला अभिनय क्षेत्रात जायचं होतं.' यश म्हणाला की, मी Pre-University Course पूर्ण केलं होंत.शिक्षणता मन लागायचं नाही. त्यावेळी मी ठरवलं की, अभिनयाकडे जायचं.

फी देखील जवळ नव्हती...

माझे आई-वडील खूप चिंतेत होते. त्यांना वाटायाचे की, मी त्यांचे काहीच ऐकत नाही. मी त्यांना म्हणालो की, मला केवळ एक संधी हवीय. मी कुठल्या ॲक्टिंग इन्स्टीट्यूट वा थिएटर ग्रुपमध्ये सहभाही होईन. तेव्हा आमच्याकडे इतके पैसे नव्हते की फी भरू शकेन. मी थिएटर करण्याचा निर्णय घेतला.

Yash
Salman Khan New Look - सलमान खानच्या नव्या लूकचा सोशल मीडियावर कहर; नयनतारासोबतच्या चित्रपटाची चर्चा रंगली

मी घरच्या मंडळींच्या विरोधात जाऊन घर सोडलं. ते म्हणाले की, “ठीक आहे, जा. पण जर परत आलास तर केवळ अभ्यास करशील.” मी म्हणालो, 'ठीक आहे.' मी जेव्हा बंगळुरुत पोहोचलो तेव्हा माझ्याकडे ३०० रुपये होते. मी खूप घाबरलो होतो. इथे प्रत्येकजण बिझी होता. पण , प्रत्येक जागी मला मदत करणारा माणूस भेटला.

थिएटर जॉईन केलंययय

मी ‘बेनाका’ थिएटर ग्रुप जॉइन केलं आणि बॅकस्टेज काम करू लागलो. बॅकस्टेज काम करताना मी दुसऱ्या कलाकारांच्या भूमिका प्रॅक्टिस करायचो. जर कुणाला उशीर झाला तर मी त्याचे डायलॉग बोलायचो. मी प्रॅक्टिस करत राहिलो आणि इमरजन्सी ॲक्टर बनलो. जर कुणी आले नाही तर, एखादा कलाकार आजारी असेल तर मला स्टेजवर पाठवलं जात होतं. नंतर मला मोठ्या भूमिका मिळाल्या. मला यासाठी पन्नास रुपये मिळायचे.

पण जेव्हा आज मी मागे वळून पाहतो तेव्हा प्रत्येक दिवशी वेगळा अनुभव होता. मुंबईतील माटुंगा परिसरात असलेल्या म्हैसूर असोसिएशनमध्ये त्याचा पहिला रंगमंचावरील अभिनय झाला होता. त्या वेळी तो नाट्यगटात पडद्यामागे काम करत होता. एका छोट्या भूमिकेसाठी कलाकार उपलब्ध नसल्याने त्याने स्वतः पुढाकार घेत भूमिका करण्याची इच्छा व्यक्त केली.

मात्र दिग्दर्शक नागभरण यांनी सुरुवातीला त्याला थांबवत आधी निरीक्षण करून अभिनय शिकण्याचा सल्ला दिला. पण यशने आत्मविश्वासाने संधी मागितली आणि अखेर त्याला रंगमंचावर काम करण्याची परवानगी मिळाली. त्याच्या या पहिल्याच अभिनयाला प्रेक्षकांची चांगली दाद मिळाली आणि त्याच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला.

त्या काळातील आर्थिक परिस्थितीही त्याने सांगितली. मुंबईला येताना त्याच्याकडे अवघे ३०० रुपये होते. नाट्यगटाकडून राहण्याची आणि जेवणाची सोय होत असल्यामुळेच तो त्यांच्यासोबत आला होता. अभिनय शिकण्याची संधी आणि मोफत प्रवास यामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

यशला सुरुवातीला टीव्ही क्षेत्रात काम करण्याची फारशी इच्छा नव्हती. त्याचे स्वप्न थेट चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमावण्याचं होतं. मात्र एका नाटकादरम्यान त्याच्यावर लक्ष गेले आणि त्याला टीव्ही मालिकेची ऑफर मिळाली. नाईलाजाने सुरू केलेल्या टीव्ही प्रवासानेच त्याला अभिनयातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या.

कॅमेऱ्यासमोर वावरणे, शॉट्स, फोकस आणि तांत्रिक बाबी यांचा अनुभव त्याला मालिकांमधून मिळाला. नवीन कलाकारांसाठी टीव्ही हे उत्तम व्यासपीठ असल्याचेही त्याने सांगितले. यशने २००४ मध्ये ‘उत्तरायण’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तो ‘नंदा गोकुला’, ‘माले बिल्लू’ आणि ‘प्रीती इल्लाडा मेले’ यांसारख्या मालिकांमध्ये झळकला.

फक्त ५०० रुपये मानधन ...

सुरुवातीला तो दिवसाला फक्त ५०० रुपये मानधन घेत होता. नंतर दुसऱ्या मालिकेसाठी त्याला १५०० रुपये मिळू लागले. मात्र कमाई झाल्यानंतरही त्याने पैसे वाचवण्याऐवजी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर खर्च करण्याला प्राधान्य दिले. चांगले कपडे आणि लूक यावर तो खर्च करत असे. अनेकांनी त्याची खिल्ली उडवली, पण यशला स्वतःला सुपरस्टार म्हणून घडवायचे होते.

Yash
Riva Arora delivery boy misconduct incident| रीवा अरोराने सांगितला धक्कादायक अनुभव; डिलिव्हरी बॉयच्या वर्तनामुळे बोलवावं लागलं पोलिसांना

यानंतर २००७ मध्ये ‘जंबदा हुडुगी’ चित्रपटातून त्याने सिनेसृष्टीत प्रवेश केला. तर २००८ मधील ‘मोग्गिना मनसू’ या चित्रपटाने त्याला खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news