Riva Arora delivery boy misconduct incident| रीवा अरोराने सांगितला धक्कादायक अनुभव; डिलिव्हरी बॉयच्या वर्तनामुळे बोलवावं लागलं पोलिसांना

Actress Riva Arora | उरी फेम रीवा अरोरासोबत डिलिव्हरी बॉयकडून गैरवर्तन, परिस्थिती इतकी बदलली की बोलवावं लागलं पोलिसांना
Riva Arora
Riva Arora delivery boy misconduct behavior Instagram
Published on
Updated on
Summary

‘उरी’ फेम अभिनेत्री रीवा अरोराने डिलिव्हरी एजंटकडून कथित गैरवर्तन झाल्याचा दावा केला आहे. परिस्थिती इतकी चिघळली की तिला आणि तिच्या कुटुंबाला मुंबई पोलिसांची मदत घ्यावी लागली. या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रीवा अरोरा सध्या एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आली आहे. रीवाने एका डिलिव्हरी बॉयवर गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप केला असून परिस्थिती इतकी बिघडली की तिला आणि तिच्या कुटुंबाला मुंबई पोलिसांची मदत घ्यावी लागली. या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा होताना दिसतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २६ एप्रिल रोजी मुंबईत घडली. रीवा अरोराने एका क्विक डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे ऑर्डर दिली होती. मात्र डिलिव्हरी बॉय घरी आल्यानंतर त्याने गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. रीवाच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीपासूनच तो उद्धटपणे बोलत होता आणि त्याने शिव्याही दिल्या. एका इंग्लिश वेबसाईटशी बोलताना तिने सांगितले की, ही परिस्थिती इतकी बिघडली की, मुंबई पोलिसांना मदतीसाठी बोलवावं लागलं.

Riva Arora
Mahesh Tilekar Reveals Actresses Behaviour | अश्विनी भावेंनी ओळख दाखवली नाही पण बॉलिवूडच्या 'या' दिग्गज अभिनेत्रीने दिला मान; महेश टिळेकरांचा दावा

गैरवर्तणूक आणि असभ्य भाषा

रीवा म्हणाली, 'सुरूवातीपासूनच तो असभ्य भाषा वापरत होता. जेव्हा मी उत्तर दिलं तर कुठलाही फायदा झाला नाही. परिस्थिती शांत करण्यासाठी तिच्या आईने हस्तक्षेप केला, पण त्यानंतरही वाद कमी झाला नाही'.

तरीही तो थांबला नाही...

रीवाने सांगितले की, डिलिव्हरी बॉयने कथितरित्या आक्षेपार्ह भाषा वापरणे सुरूच ठेवले. तिची बहीण लिफ्टमध्ये त्याला भेटल्यानंतरही वाद वाढत गेला. हा संपूर्ण प्रकार जवळपास ३० ते ४० मिनिटे सुरू होता, असा दावा अभिनेत्रीने केला आहे. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबाने मुंबई पोलिसांशी संपर्क साधला.

अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच या प्रकरणात संबंधित डिलिव्हरी कंपनीकडे अधिकृत तक्रारही दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पण अद्याप कुठलेही स्पष्ट उत्तर मिळाले नाही. याप्रकरणी रीवाने पोलिसांत तक्रार दिलीय.

Riva Arora
Thalapthy Vijay | सुपरस्टारचा मोठेपणा इथेच दिसला! प्रेमाखातर थलपतिची तहान-भूक हरपली; ४५ अंश तापमानात उभा राहिला, श्रिया सरनने सांगितला भावूक प्रसंग

कोण आहे रीवा अरोरा?

रीवा अरोरा ही एक लोकप्रिय बालकलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक', 'मॉम' आणि 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी ती ओळखली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news