Yami-Emraan Hashmi Film | "शाह बानो प्रकरण रूपेरी पडद्यावर – यामीचा 'न्यायासाठीचा लढा', इमरान हाशमी जोडीला

Yami Gautam-Emraan Hashmi movie on Shah Bano Case | 'शाह बानो' प्रकरणावर चित्रपट येतोय. यामी गौतम आणि इमरान हाशमी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
image of Yami Gautam and Emraan Hashmi
यामी गौतम-इमरान हाशमी यांचा नवा चित्रपट येणार आहेInstagram
Published on
Updated on

Yami Gautam Emraan Hashmi Film

मुंबई :

'शाह बानो' प्रकरणावर चित्रपट येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि इमरान हाशमी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर २०२५ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होईल, असे म्हटले जात आहे. शाह बानो हे अत्यंत संवेदनशील प्रकरण असून हा चित्रपट १९८५ च्या केसवर आधारित आहे. देशातील मुस्लिम महिलांच्या अधिकार आणि वाद अशा प्रकरणावर ही कथा असल्याची माहिती मिळतेय. चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण जाले असून पुढील टप्पा सुरु आहे. (Yami Gautam Emraan Hashmi Film) पहिल्यांदा उत्तर प्रदेश किंवा लखनौ येथे चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होईल.

यामी गौतम साकारणार ही भूमिका

यामी गौतम शाह बानोची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची कथा अशा केसवर आधारित आहे, जी एका मुस्लिम महिलेला तिच्या पतीकडून घटस्फोटानंतर उदरनिर्वाहासाठी भत्ता मिळावा यासाठी कायदेशीर लढाई लढते. हाच या चित्रपटाचा केंद्रबिंदू असून शाहबानोचा हा केवळ वैयक्तिक लढा नव्हता, तर देशभरातील अनेक मुस्लिम महिलांच्या न्यायासाठीचा लढा होता.

image of Yami Gautam and Emraan Hashmi
प्रेमाच्या गुलकंदाची चव चाखवणारे 'गुलकंद'चे टायटल सॉन्ग पाहिलं का?

इमरान हाशमी या भूमिकेत

इमरान हाशमी एका वकिलाच्या भूमिकेत असेल. तो शाह बानोच्या बाजून कोर्टात लढा देताना दिसेल. चित्रपटात ७० आणि ८०च्या दशकातील पृष्ठभूमी दाखवण्यात येईल. एक महिला आपल्या अधिकारासाठी संपूर्ण समाज आणि व्यवस्थेशी संघर्ष करते. यामी गौतम एक साहसी महिलेच्या भूमिकेत असेल.

image of Yami Gautam and Emraan Hashmi
Devmanus |''फक्त ‘सुई’ बदलली आहे, देवमाणूस तोच आहे..तो परत येतोय!''

‘आर्टिकल ३७०’ मध्ये यामीचा दमदार परफॉर्मन्स

यामीने ‘आर्टिकल ३७०’ मध्ये दमदार परफॉर्मन्स दिला होता. इमरान हाशमी देखील ‘ग्राउंड जीरो’ मध्ये एक बीएसएफ ऑफिसरच्या रूपात दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news