नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : बॉलिवुड अभिनेत्री यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धरशी नुकतेच हिमाचलमध्ये लग्नाच्या बंधनात अडकली. यामीने स्वतः सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत लग्न केल्याचे चाहत्यांना सांगितले होते. सध्या या लग्नातील आणखीन खास असे फोटो यामीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यामीने आपल्या इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर लग्नाची केल्याची माहिती दिली होती. लग्नात यामीने लाल रंगाची साडीसोबत नाकात नथ परिधान केली होती. तर दिग्दर्शक आदित्य धर यांनी शेरवानी घातली होती. हा विवाह सोहळ्या सर्व रितीवाजानुसार अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला. फोटोच्या कॅप्शनमध्ये यामीने लिहिले होते की, 'कुटुंबियांच्या आशिवार्दाने आम्ही दोघे जण लग्न बंधनात अडकलो आहोत. मर्यादित लोकांच्याच उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडण्यात आला आहे.'
सध्या या लग्नातील खास आणखीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत यामी काही पारंपारीक रितीवाज पार पाडताना लाल रंगाच्या साडीत दिसत आहे. यासोबतच तिची बहिण सुरीली गौतम हिदेखील दिसत आहे. यामीने हळदी आणि मेंहदीचे काही फोटो शेअर केले आहेत या फोटोत तिने हातावर मेंहदी असून पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसते.
यामीच्या इन्स्टाग्रामवरील या लग्नाच्या फोटोमुळे चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. या यादीत अभिनेता कार्तिक आर्यन, वाणी कपूर, जॅकलिन फर्नांडिस, वरूण धवन, ताहिरा कश्यप, अशा बॉलिवूड स्टार्सनी शुभेच्छा दिल्या. यामी आणि आदित्य या दोघांनी २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'उरी : द् सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटात एकत्र काम केलेले होते.
(सर्व फोटो yamigautam instagram वरून साभार)