Premacha Gulkand Song
सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्या चित्रपटातील टायटल ट्र्रॅक रिलीज झाले Instagram

प्रेमाच्या गुलकंदाची चव चाखवणारे 'गुलकंद'चे टायटल सॉन्ग पाहिलं का?

Premacha Gulkand Song | १ मे रोजी 'गुलकंद' चित्रपट प्रदर्शित होणार
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क - एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेटक्लाऊड प्रोडक्शन निर्मित ‘गुलकंद’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या १ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच रसिकांचे लक्ष वेधले आहे. ‘चल जाऊ डेटवर’ आणि ‘चंचल’ यांसारख्या गाण्यांनी आणि दमदार ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये एक विशेष उत्सुकता निर्माण केली असतानाच आता या चित्रपटातील 'प्रेमाचा गुलकंद' हे बहारदार शीर्षकगीत संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे.

'प्रेमाचा गुलकंद’ हे रंगतदार आणि बहारदार गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. रोहित राऊत, सावनी रवींद्र आणि आशिष कुलकर्णी यांच्या सुमधुर आवाजाने यात अधिकच रंगत आणली आहे. अमीर हडकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे सचिन मोटे गीतकार आहेत. तर राजेश बिडवे यांचे नृत्यदिग्दर्शन या गाण्याला लाभले आहे. 'प्रेमाचा गुलकंद'मध्ये सर्व कलाकारांचे एनर्जीने भरलेले धमाल नृत्य पाहायला मिळतेय.

दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी म्हणतात, "आजच्या काळात प्रेक्षक फक्त कन्टेंट नाही तर एक नवा अनुभव शोधत असतात. आम्ही ‘गुलकंद’मधून त्यांच्या रोजच्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि हलकीफुलकी मजा घेऊन येण्याचा प्रयत्न केला आहे."

निर्माते, गीतकार सचिन मोटे म्हणतात, ‘गुलकंद’ हा मधुर असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात मधुरता आणणारे शब्द गाण्यात पेरण्याचा मी प्रयत्न केला आहे. नाते जेवढे मुरते तेवढे ते अधिक बहरत जाते आणि त्यात गोडवा आपसुकच येतो, हेच या गाण्यातून दाखवण्यात आले आहे.’’

निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, "आम्ही नेहमीच मनोरंजनात्मक चित्रपट रसिकांसाठी घेऊन येत असतो. 'गुलकंद’हा देखील त्याच्याच एक गोड भाग आहे. 'प्रेमाचा गुलकंद’ हे गाणे म्हणजे त्या भावना, आठवणी आणि मजेशीर क्षणांची गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे न कुठे असतेच.''

सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news