Kon Honaar Crorepati: ‘कोण होणार करोडपती’चा नवा होस्ट कोण? मराठी अभिनेत्रीच्या नावाची जोरदार चर्चा; सेलिब्रिटींच्या...

Madhuri Dixit Kon Honaar Crorepati: ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वासाठी होस्टच्या नावाबाबत उत्सुकता वाढली असून अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
Madhuri Dixit Kon Honaar Crorepati
Madhuri Dixit Kon Honaar CrorepatiPudhari
Published on
Updated on

Madhuri Dixit Kon Honaar Crorepati: 'कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. शोचा प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला असला, तरी यंदा सूत्रसंचालनाची जबाबदारी नेमकी कोणाच्या खांद्यावर असणार, याचा खुलासा अद्याप अधिकृतपणे करण्यात आलेला नाही. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळ्यातील काही खास क्षणांमुळे या प्रश्नाचं उत्तर जवळपास मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

यंदाच्या पर्वाचा होस्ट म्हणून बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित हिच्या नावाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र, अद्याप संबंधित वाहिनी किंवा शोच्या निर्मात्यांकडून माधुरीच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही.

‘कोण होणार करोडपती’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

ज्ञान आणि मनोरंजन यांचा मिलाफ असलेला ‘कोण होणार करोडपती’ हा शो मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. त्यामुळे नव्या पर्वाची घोषणा होताच शोचा होस्ट कोण असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली.

यापूर्वी सचिन खेडेकर, स्वप्नील जोशी आणि नागराज मंजुळे यांसारख्या लोकप्रिय चेहऱ्यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आहे. त्यामुळे यंदा निर्माते पुन्हा एखाद्या मराठी कलाकाराची निवड करणार की वेगळा चेहरा प्रेक्षकांसमोर आणणार, याकडे सर्वांचं लक्ष होतं. शोच्या प्रोमोमध्येही होस्टचा चेहरा आणि नाव स्पष्टपणे समोर न आणता उत्सुकता कायम ठेवण्यात आली होती.

फिल्मफेअरच्या मंचावर मिळाले संकेत?

या गूढतेत भर पडली ती नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळ्यामुळे. या कार्यक्रमाला मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते. याच कार्यक्रमादरम्यान ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची आणि त्याच्या सूत्रसंचालकाची झलक काही निवडक पाहुण्यांना दाखवण्यात आल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे, होस्टचं नाव समोर आल्यानंतर उपस्थित सेलिब्रिटींच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंदाचे भाव दिसून आले. रेणुका शहाणे, अमृता फडणवीस, भरत जाधव यांच्यासह अनेकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. याच प्रतिक्रियांवरून नेटकऱ्यांनी आपापले अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.

Madhuri Dixit Kon Honaar Crorepati
Nikita Rawal Viral Video: सेल्फीसाठी आली अन् अचानक केलं किस; ‘गरम मसाला’ फेम अभिनेत्री निकिता रावलसोबत नेमकं काय घडलं?

माधुरी दीक्षितच का चर्चेत आली?

सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियांमध्ये दिसणारा उत्साह आणि ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या होस्टबाबत ठेवण्यात आलेलं गुपित यामुळे सोशल मीडिया युजर्सनी थेट माधुरी दीक्षितचं नाव पुढे केलं आहे.

माधुरी दीक्षित ही केवळ बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री नाही, तर महाराष्ट्राशी आणि मराठी मनोरंजनविश्वाशीही तिचं घट्ट नातं आहे. त्यामुळे एका लोकप्रिय मराठी क्विझ शोसाठी तिची निवड झाली तर ती प्रेक्षकांसाठी निश्चितच मोठी आकर्षणाची बाब ठरू शकते.

याच कारणामुळे 'माधुरी दीक्षित आता ‘कोण होणार करोडपती’च्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार का?’ हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

रेणुका शहाणेंची प्रतिक्रिया

फिल्मफेअर सोहळ्यातील प्रतिक्रियांमध्ये रेणुका शहाणे यांची प्रतिक्रिया विशेष लक्षवेधी ठरल्याचे बोलले जात आहे. होस्टचं नाव समजल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद पाहून नेटकऱ्यांनी माधुरीच्या नावाच्या चर्चेला आणखी हवा दिली.

अमृता फडणवीस आणि भरत जाधव यांच्या प्रतिक्रियांमुळेही ‘होस्ट म्हणून एखादा मोठा आणि सर्वांना परिचित चेहरा येणार आहे’ असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या सर्व चर्चा या अंदाज आहेत, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा कायम आहे.

Madhuri Dixit Kon Honaar Crorepati
Varanasi Mahesh Babu's look| ‘वाराणसी’मध्ये महेश बाबूचा रुद्र अवतार! आफ्रिकेच्या जंगलात दिसला दमदार लूक

अधिकृत घोषणा कधी होणार?

सध्या माधुरी दीक्षितच ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार, अशी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा आणि फिल्मफेअर सोहळ्यातील कलाकारांच्या प्रतिक्रियांवरून हा अंदाज बांधला जात आहे.

त्यामुळे निर्माते किंवा संबंधित वाहिनीकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे. मात्र, जर माधुरी दीक्षितच या शोची होस्ट असेल, तर तिचा ग्लॅमर, सहज संवाद साधण्याची शैली आणि प्रेक्षकांशी असलेलं नातं यामुळे ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाला एक वेगळीच रंगत येण्याची शक्यता आहे. आता ‘धकधक गर्ल’ खरंच करोडपतीच्या खुर्चीवर बसणार का? याचं उत्तर अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल.

logo
Pudhari News
pudhari.news