

Dhurandhar OTT Release Netflix Deal: रणवीर सिंहचा स्पाय अॅक्शन थ्रिलर ‘धुरंधर’ सध्या थिएटर्समध्ये जबरदस्त प्रदर्शन करत आहे. प्रेक्षकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळत असतानाच आता या चित्रपटाच्या OTT रिलीजबाबत मोठी बातमी समोर येत आहे. फिल्ममेकर्सनी एका जागतिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसोबत करार केल्याची माहिती आहे. ही डील रणवीरच्या करिअरमधील सर्वात महागडी OTT डील मानली जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सने ‘धुरंधर’चे OTT राइट्स जवळपास 130 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. सध्याच्या OTT मार्केटमध्ये कमी होत चाललेल्या रेट्सच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम प्रचंड मोठी मानली जात आहे.
बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, ही रक्कम चित्रपटाच्या दोन्ही भागांसाठी ठरली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘धुरंधर पार्ट 1’ आणि ‘धुरंधर पार्ट 2’ मिळून 130 कोटींचा करार झाला असून, प्रत्येक भागाचे डिजिटल राइट्स अंदाजे 65 कोटींना विकले आहेत.
चित्रपटाच्या OTT रिलीजची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र सामान्यतः थिएट्रिकल रिलीजनंतर 6 ते 8 आठवड्यांत चित्रपट OTTवर येतो. ‘धुरंधर’ 5 डिसेंबरला थिएटर्समध्ये झळकला असल्याने, हा चित्रपट जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी 2025च्या सुरुवातीला नेटफ्लिक्सवर येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ‘धुरंधर: पार्ट टू’ मार्च 2025मध्ये रिलीज होणार असल्याचे सांगितले जात आहे.
फक्त 5 दिवसांत ‘धुरंधर’ने 150 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून तसेच समीक्षकांकडूनही उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. आदित्य धर दिग्दर्शित ही फिल्म हाय व्होल्टेज अॅक्शन, दमदार बॅकग्राउंड स्कोर आणि भावनिक संघर्षामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवते.
रणवीर सिंहच्या करिअरमधील सर्वाधिक चर्चेत असलेली ही फिल्म OTTवर आल्यानंतरही मोठा धमाका करेल, अशी अपेक्षा आहे.