

‘बॉर्डर 2’मधील अहान शेट्टीचा रक्तमाखलेला पोस्टर लुक रिलीज झाला असून तो नेव्ही ऑफिसरच्या दमदार अवतारात दिसत आहे. पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून या लुकला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
Ahan Shetty new look from Border 2 viral
बॉलिवूड अभिनेता अहान शेट्टी पुन्हा एकदा अॅक्शन अवतारात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी ‘बॉर्डर २’ चित्रपटातील पहिला पोस्टर लूक प्रदर्शित झाला आहे. त्यात तो नेव्ही युनिफॉर्ममध्ये रक्ताने माखलेला, रागाने भरलेल्या अवतारात दिसत आहे. पोस्टर रिलीज होताच सोशल मीडियावर बॉर्डर २ ची चर्चा सुरू झाली.
पोस्टरमध्ये अहानचा चेहरा जखमी, कपाळावर रक्त, डोळ्यांत राग दिसतो. भारतीय नेव्ही अधिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या अहानचा हा लुक खूप व्हायरल होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘बॉर्डर २’ ही केवळ युद्धकथा नसून देशभक्ती आणि सैनिकांच्या त्यागाचा भव्य संगम असणार आहे. अहानने या भूमिकेसाठी प्रशिक्षण घेतल्याचे सांगितले जाते. नेव्ही ड्रिल्स, शस्त्र हाताळणी आणि अॅक्शन सिक्वेन्सेससाठी विशेष तयारी केल्याचे म्हटले जाते.
अहान शेट्टीचा 'बॉर्डर २' लूक जारी
टी-सीरीज फिल्म्सच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टरवर लोकांनी हार्ट आणि फायर इमोजी देणे सुरु केले आहे. सोबतच निर्मात्यांनी लवकरात ट्रेलर रिलीज करण्याची मागणी केली आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी अहान शेट्टीच्या पोस्टरला पाहिलं आणि म्हटलं - 'ब्लॉकबस्टर.' दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, 'पोस्टरमध्ये जितकं दम दिसतो, चित्रपट तितकाच धमाकेदार असेल.'