

Google Trends 2025 Movies: 2025मध्ये प्रेक्षकांनी गुगलवर कोणत्या फिल्म्स सर्वात जास्त सर्च केल्या याची यादी आता समोर आली आहे. एका बाजूला ‘सिकंदर’, ‘वॉर 2’ आणि ‘जाट’ सारख्या भव्य बजेटच्या आणि मोठ्या स्टारकास्टच्या फिल्म्स बॉक्स ऑफिसवर आपटताना दिसल्या; तर दुसऱ्या बाजूला कमी बजेट असलेल्या फिल्म्सनी 2025मध्ये कमाल करत बॉक्स ऑफिसवर धमाका केला.
यामध्ये सर्वात जास्त गाजलेला चित्रपट ठरला मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’, जो गुगल सर्च ट्रेंड्समध्ये नंबर 1वर होता. फक्त 27 वर्षांचा अहान पांडे या फिल्मचा हिरो असून, त्याने या एकाच फिल्मने प्रेक्षकांचे मन जिंकून मोठमोठ्या सुपरस्टार्सलाही मागे टाकलं आहे.
सैयारा
कांतारा: चॅप्टर 1
कुली
वॉर 2
सनम तेरी कसम (री-रिलीज)
मार्को
हाऊसफुल 5
गेम चेंजर
मिसेस
महावतार नरसिम्हा
18 जुलै 2025 ला रिलीज झालेली ‘सैयारा’ ही म्युझिकल रोमँटिक फिल्म यात वर्षात सर्वात जास्त सर्चमध्ये होती.
बजेट: 45 कोटी
भारतात नेट कलेक्शन: 329 कोटी
वर्ल्डवाइड: 570 कोटी
फिल्म, त्याची स्टारकास्ट—विशेषतः अहान पांडे आणि अनीत आणि त्यातील गाणी सर्वाधिक सर्च झाली.
ऋषभ शेट्टीचा प्रीक्वल 2 ऑक्टोबर 2025 ला रिलीज झाला आणि सुपरहिट झाला.
भारतात कलेक्शन: 622.21 कोटी
वर्ल्डवाइड: 852 कोटी
गूगल सर्च लिस्टमध्ये हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर होता.
रजनीकांतच्या प्रचंड फॅन फॉलोइंगमुळे ‘कुली’ गुगलवर नंबर 3वर होता.
बजेट: 350 कोटी
भारतात नेट कलेक्शन: 285 कोटी
आमिर खान आणि उपेंद्र यांचं कॅमियो हेही चर्चेचं कारण ठरलं.
ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर स्टारर, अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर 2’ कडून खूप अपेक्षा होत्या मात्र त्याला बॉक्स ऑफिसवर थंड प्रतिसाद मिळाला.
कलेक्शन: 236 कोटी
बजेट: 350–400 कोटी
सर्चमध्ये 4 नंबरवर, पण बॉक्स ऑफिसवर फ्लॉप
‘सनम तेरी कसम’ 7 फेब्रुवारी 2025 ला झालेल्या री-रिलीजमुळे ही फिल्म पुन्हा एकदा व्हायरल झाली. री-रिलीज कलेक्शन 40 कोटी झाले होते. त्यामुळे Google सर्चमध्ये ती थेट पाचव्या क्रमांकावर पोहोचली.