

Rehman Dakait Real Story: रणवीर सिंह, अक्षय खन्ना आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाची चर्चा भारतातच नाही तर पाकिस्तानमध्येही होत आहे. कारण या चित्रपटातील कथानक काल्पनिक नसून, कराचीच्या कुख्यात ल्यारी भागातील प्रत्यक्ष गँगवॉरवर आधारित आहे. चित्रपटातील रहमान डकैत आणि एसपी असलम ही दोन्ही पात्रे खरी आहेत.
कराचीमधील सर्वांत जुना, गरीब आणि घनदाट वस्तीचा परिसर म्हणजे ल्यारी. कधीकाळी या भागाची ओळख फुटबॉल क्लब आणि बॉक्सिंगमुळे ‘मिनी ब्राझील’ म्हणून होती. पण 1979–89 मधील अफगाण–सोव्हिएत युद्धानंतर शस्त्रे आणि ड्रग्सचा पुरवठा पाकिस्तानात वाढला आणि ल्यारीचा चेहराच बदलून गेला. गरीबी, बेरोजगारी आणि स्थानिक राजकारणामुळे येथे गुन्हेगारीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले.
1960 ते 80 च्या दशकात चरस व्यापारातून लहान गट तयार झाले. 1990 नंतर बाबू डकैतसारखे संघटित गुंड पुढे आले. याच काळात रहमान डकैतचा उदय झाला (1975–2009), त्याला ल्यारीचा निर्दयी ‘किंग’ म्हणायचे. त्याचं खरं नाव सरदार अब्दुल रहमान बलोच
उर्फ रहमान डकैत
● किशोरवयात गुन्हेगारीला सुरुवात केली
● 2001 नंतर ल्यारीतील सर्वात मोठ्या गँगचा प्रमुख
● ड्रग्स, एक्सटॉर्शन, जुगारातून करोडोंची कमाई केली
● पण लोकप्रियता मिळवण्यासाठी क्लिनिक, मदरसे आणि फुटबॉल क्लबला निधी दिला
2008 मध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टीने (PPP) त्याला पीपल्स अमन कमिटीचा प्रमुख बनवले. वरकरणी ‘शांती समिती’, पण प्रत्यक्षात अंडरवर्ल्डचे संरक्षण करणे हा त्यामागचा हेतू होता. त्याची सर्वांत मोठी लढाई अरशद पप्पू गँगसोबत होती. चित्रपटातील अक्षय खन्ना साकरत असलेली रहमान डकैतची भूमिका याच कुख्यात गुंडावर आधारित आहे.
सिंध पोलिसांमध्ये एएसआय म्हणून कारकीर्द सुरू करणारे चौधरी असलम नंतर CID चे प्रमुख झाले.
● तालिबान आणि कराचीतील माफियांवर त्यांनी कारवाई केली
● शेकडो एन्काउंटरमुळे ‘पाकिस्तानचा डर्टी हॅरी’ म्हणून त्यांना ओळख मिळाली
● 2009 मध्ये रहमान डकैतला एन्काउंटरमध्ये मारले
● 2014 मध्ये टीटीपीच्या सुसाईड अटॅकमध्ये त्यांचा मृत्यू झाला
संजय दत्तचे चित्रपटातील हे पात्र याच असलम खानवर आधारित आहे.
2004 ते 2013 या काळात ल्यारीमध्ये
● रॉकेट लाँचर, बॉम्बस्फोट, दररोजचे शूटआउट
● ड्रग कार्टेल्सचे साम्राज्य
● PP–MQM राजकीय संघर्ष सुरु होता
अरशद पप्पूच्या हत्या–प्रकरणात तर गुंडांनी त्याचे डोके कापून फुटबॉल खेळल्याची थरारक माहिती स्थानिक तपासात आहे.
आज हा परिसर तुलनेने शांत आहे. फुटबॉल क्लब पुन्हा उभे राहत आहेत. 2024 मध्ये ल्यारीच्या तरुणांनी राष्ट्रीय युवा फुटबॉल स्पर्धाही जिंकली. परंतु राजकीय गुंडगिरी, ड्रग्सचे नेटवर्क आणि गँगवॉरने झालेल्या जखमा आजही जिवंत आहेत.