Dhol Tasha Pathak: 'तुला राग आला तर...', विद्याधर जोशींच्या 'त्या' पोस्टवर श्रुती मराठेचा संताप, म्हणाली, 'घरी बसून फेसबुकवर...'

Kalavant Dhol Tasha Pathak: पुण्यातील ‘कलावंत ढोल-ताशा पथका’च्या वादनावर अभिनेते विद्याधर जोशी यांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले.
Vidyadhar Joshi Shruti Marathe
Vidyadhar Joshi Shruti MarathePudhari
Published on: 
Updated on: 

Kalavant Dhol Tasha Pathak: गणेशोत्सव म्हटलं की ढोल-ताशा पथकांचा उत्साह आणि जोश हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत तर ढोल-ताशांच्या गजराला विशेष महत्त्व असतं. पुण्यातील ‘कलावंत ढोल-ताशा पथक’ हे देखील याच उत्सवाचा महत्त्वाचा भाग आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार या पथकाचे सदस्य आहेत.

अभिनेत्री श्रुती मराठे, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, सौरभ गोखले यांच्यासह अनेक कलाकार दरवर्षी ढोल-ताशा वादनात सहभागी होताना दिसतात. या कलाकारांचे वादनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

मात्र, यंदा या पथकाच्या वादनावरून अभिनेता विद्याधर जोशी यांनी सोशल मीडियावर काही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या पोस्टनंतर अभिनेत्री श्रुती मराठे यांनी त्यांना थेट उत्तर दिलं. त्यानंतर विद्याधर जोशी यांनीही श्रुती यांच्या कमेंटला उत्तर दिलं आहे. त्यामुळे दोघांच्या पोस्ट आणि कमेंटची सध्या चर्चा सुरू आहे.

विद्याधर जोशी यांनी काय विचारलं?

विद्याधर जोशी यांनी फेसबुकवर पोस्ट करत ‘कलावंत ढोल-ताशा पथका’च्या वादनाबाबत दोन प्रश्न विचारले. त्यांनी म्हटलं की, पुण्यातील कलाकारांच्या पथकातील कलाकार विसर्जनाच्या मिरवणुकीत एकूण किती वेळ वादन करतात? तसेच, सोशल मीडियावरील रिल्समध्ये ज्या उत्साहाने आणि जोशाने ते वादन करताना दिसतात, त्याच जोशात ते प्रत्यक्ष मिरवणुकीत सातत्याने वादन करतात का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या पोस्टनंतर अभिनेत्री श्रुती मराठे यांनी त्यावर कमेंट करत सविस्तर उत्तर दिलं.

श्रुती मराठेने दिलं थेट उत्तर

श्रुती मराठेने विद्याधर जोशी यांच्या पोस्टवर कमेंट करताना सांगितलं की, पथकातील कलाकार सुमारे दीड महिना सराव करतात. त्यानंतर गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत तब्बल १४ वेळा वादन केलं जातं. याशिवाय विसर्जनाच्या दिवशी जवळपास साडेसात तासांची मिरवणूक आणि वादन असतं.

आपल्याला वादन मनापासून आवडत असल्याचंही श्रुतीने स्पष्ट केलं. तसेच, त्यांच्या वादनाबाबत शंका असेल तर पुढच्या वर्षी एक दिवस प्रत्यक्ष येऊन पाहावं, असंही त्यांनी सुचवलं.

श्रुतीने आपल्या कमेंटमध्ये म्हटलं की, केवळ फेसबुकवर प्रश्न विचारून त्यांची उत्तरं मिळत नाहीत. जे लोक कलाकारांचं वादन प्रत्यक्ष पाहतात, ते असे प्रश्न सोशल मीडियावर विचारत नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Vidyadhar Joshi Shruti Marathe
Rise & Fall: कोण आहे ही अभिनेत्री? क्रिकेटर्सही आहेत फिदा; वीरेंद्र सेहवागसमोर केला मोठा खुलासा

विद्याधर जोशी यांनीही दिलं स्पष्टीकरण

श्रुती मराठे यांच्या उत्तरानंतर विद्याधर जोशी यांनी त्यांच्या कमेंटवर पुन्हा प्रतिक्रिया दिली. श्रुती यांनी दिलेल्या उत्तरातील पहिल्या काही ओळींतच आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

‘माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. प्रत्यक्ष येऊन बघण्याची काहीही गरज नाही,’ असं त्यांनी म्हटलं. तसेच, स्वतःला वादन करण्याची आवड असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Vidyadhar Joshi Shruti Marathe
Salman Khan: ‘एक-दोन जणांना तुरुंगात टाका, मगच हा प्रकार थांबेल’, असं काय घडलं की सलमान खान संतापला

वादन करणाऱ्यापेक्षा ते ऐकणाऱ्या किंवा पाहणाऱ्या व्यक्तीला जास्त त्रास होऊ शकतो, असा आपला वैयक्तिक अनुभव असल्याचं विद्याधर जोशी यांनी नमूद केलं. केवळ सोशल मीडियावरील रिल्स पाहिल्यामुळे आपल्याला प्रश्न पडले होते आणि प्रत्यक्ष वादन पाहिलेलं नव्हतं, हेही त्यांनी मान्य केलं.

शेवटी श्रुती यांनी आपल्या प्रश्नाला फेसबुकवर उत्तर दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. तसेच, आपल्या पोस्टमुळे श्रुतीला राग आला असेल, तर ते योग्यच असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news