Rise & Fall: कोण आहे ही अभिनेत्री? क्रिकेटर्सही आहेत फिदा; वीरेंद्र सेहवागसमोर केला मोठा खुलासा

Who Is Sara Gurpal: सारा गुरपाल ही पंजाबी मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल आहे.
Who Is Sara Gurpal Cricketers’ Messages
Who Is Sara Gurpal Cricketers’ MessagesPudhari
Published on: 
Updated on: 

Who Is Sara Gurpal: आपल्या सुंदर आवाजाने, दमदार अभिनयाने आणि भन्नाट डान्समुळे लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी सारा गुरपाल पंजाबी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका आहे. पंजाबी चित्रपट आणि संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर साराने हिंदी रिअॅलिटी शोमध्येही काम केले आहे. सध्या ती माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांच्या ‘राइज अँड फॉल’ या शोमुळे चर्चेत आली आहे.

मॉडेलिंगपासून करिअरला सुरुवात

सारा गुरपालचा जन्म हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यात झाला. मात्र तिचे बालपण आणि शिक्षण चंदीगडमध्ये झाले. लहानपणापासूनच तिला कला आणि फॅशनची आवड होती. याच आवडीमुळे तिने मॉडेलिंगच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला.

2012 मध्ये साराने ‘मिस चंदीगड’ हा किताब पटकावला. या यशामुळे तिच्यासाठी मनोरंजन क्षेत्राचे दरवाजे खुले झाले. त्यानंतर तिने पंजाबी संगीत क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.

2013 मध्ये पंजाबी गायक रंजीत बावा यांच्या ‘जीन’ या गाण्यात साराने मुख्य मॉडेल म्हणून काम केले. हे गाणे चांगलेच लोकप्रिय झाले. त्यानंतर साराने अनेक पंजाबी गाण्यांच्या म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले.

मॉडेलिंगसोबतच साराने गायन क्षेत्रातही पाऊल ठेवले. आपल्या आवाजाच्या जोरावर तिने पंजाबी संगीत क्षेत्रातही वेगळी ओळख निर्माण केली.

पंजाबी चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण

मॉडेलिंग आणि म्युझिक व्हिडिओमध्ये लोकप्रियता मिळवल्यानंतर साराने पंजाबी चित्रपटांकडे मोर्चा वळवला. 2017 मध्ये ‘मंजे बिस्तरे’ या पंजाबी चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले.

तिच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तिला हिंदीतील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 14’ मध्येही सहभागी होण्याची संधी मिळाली. मात्र या शोमध्ये तिचा प्रवास फार काळ टिकला नाही. सुरुवातीच्या काळातच तिला घराबाहेर पडावे लागले.

Who Is Sara Gurpal Cricketers’ Messages
Salman Khan: ‘एक-दोन जणांना तुरुंगात टाका, मगच हा प्रकार थांबेल’, असं काय घडलं की सलमान खान संतापला

‘राइज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमध्ये एंट्री

‘बिग बॉस’नंतर आता सारा गुरपाल पुन्हा एकदा रिअॅलिटी टीव्हीवर दिसत आहे. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांच्या ‘राइज अँड फॉल’ या शोमध्ये तिने दमदार एंट्री केली आहे.

शोच्या प्रीमियर एपिसोडमध्ये साराने आपल्या खास अंदाजात एक मजेशीर खुलासा केला. तिने वीरेंद्र सेहवाग यांच्यासमोर सांगितले की, अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू तिला सोशल मीडियावर मेसेज करतात.

Who Is Sara Gurpal Cricketers’ Messages
Who Is Tanya Mishra: गिरिजा ओकनंतर आता देशात 'हिची' चर्चा... भारताची नवी 'नॅशनल क्रश' तानिया मिश्रा आहे तरी कोण?

साराच्या या वक्तव्यानंतर शोमध्ये चांगलीच चर्चा रंगली. तिच्या या खुलाशावर वीरेंद्र सेहवाग यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिली. शोचा हा भाग प्रसारित झाल्यानंतर सोशल मीडियावरही साराच्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली.

मात्र साराने नेमके कोणते क्रिकेटपटू तिला सोशल मीडियावर मेसेज करतात, यांची नावे जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे तिच्या या खुलाशानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.

आता ‘राइज अँड फॉल’मध्ये सारा गुरपाल आपल्या बेधडक स्वभावासोबतच खेळाची रणनीती कशी वापरते आणि शोमध्ये किती पुढे जाते, याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news