Shruti Marathe | ‘माझ्या सौंदर्यापेक्षा माझ्या कामाबद्दल बोला’ : अभिनेत्री श्रुती मराठेचे रोखठोक मत!

‘सौंदर्य ही माझी अचिव्हमेंट नाही ते मला आई वडिलांकडून मिळाले...’
अभिनेत्री श्रुती मराठे
अभिनेत्री श्रुती मराठे
Published on
Updated on

Shruti Marathe : मराठी - हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री श्रुती मराठे तिच्या सहजसुंदर अभिनयासोबतच सौंदर्यासाठीही ओळखली जाते. मात्र, अनेकदा कलाकारांच्या कामापेक्षा किंवा अभिनयापेक्षा त्यांच्या बाह्य रूपाचीच जास्त चर्चा होताना दिसते. याच मुद्द्यावर श्रुती मराठेने एका मुलाखतीत अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक मत व्यक्त केले असून माझ्या सौंदर्यापेक्षा लोकांनी माझ्या कामाची आणि अभिनयाची दखल घ्यावी, अशी भावना तिने व्यक्त केली आहे. अमुक - तमुक या पॉडकास्टशी बोलताना तीने हे मत व्यक्त केले.

मुलाखतीत श्रुतीला ‘तुझ्या कामापेक्षा तू कशी दिसतेस याचीच जास्त चर्चा होते, हे कितपत योग्य वाटते?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना तिने हे अजिबात योग्य वाटत नसल्याचे सांगितले.

सौंदर्य ही अचिव्हमेंट नाही ते आई-वडिलांकडून मिळाले आहे

पुढे श्रुती म्हणते की "सौंदर्य ही अशी गोष्ट आहे जी मी स्वतः कमावलेली नाही, म्हणजेच ती माझी ‘अचीव्हमेंट’ नाही. मी जेव्हा स्वतः एखादी गोष्ट मिळवते किंवा कमावते, तेव्हाच मला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो. रूप किंवा सौंदर्य हे मला माझ्या आई-वडिलांकडून मिळाले आहे. पण मी ते मेंटेन केले आहे असेही ती म्हणाली

अभिनेत्री श्रुती मराठे
Shruti Marathe | 'स्वप्नसुंदरी आज मी पाहिली..' पिंक टी-शर्टमध्ये श्रुतीचं मधाळ हास्य

केवळ दिसण्यापेक्षा माझ्या कामाची प्रशंसा व्हावी

श्रुती पुढे म्हणाली, लोक जेव्हा सौंदर्याची स्तुती करतात, तेव्हा ऐकायला नक्कीच छान वाटते. कुणालाही सौंदर्याची तारीफ केलेली आवडते. पण त्याही पलीकडे जाऊन मी काय काम करते, हे पाहून लोकांनी कौतुक केले तर मला जास्त आवडेल. भविष्यात लोकांनी मला ‘श्रुती एक चांगली माणूस होती आणि उत्तम अभिनेत्री होती’ म्हणूनच लक्षात ठेवावे किंवा आठवावे अशी माझा इच्छा आहे असेही तीने स्पष्ट केले.

मला माझ्या कामाविषयी बोलायला आवडते

यावेळी श्रुती म्हणाली की मला माझ्या चाहत्‍यांबद्दल माझ्या कामाबाबत बोलताना आवडते. ‘मला अशा लोकांशी किंवा चाहत्यांशी बोलायला जास्त आवडते, जे ‘तू किती सुंदर दिसतेस’ असे म्हणण्यापेक्षा ‘तुझे या चित्रपटातील काम उत्तम होते’ किंवा ‘तू केलेला प्रयोग आवडला’ अशा कामावर चर्चा करतात. पण जेव्हा नवीन लोक भेटतात तेव्हा पहिल्यांदा दिसण्यावरच प्रतिक्रिया देतात; मात्र माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि मला खऱ्या अर्थाने ओळखणाऱ्यांना माहिती आहे की मला माणूस म्हणून आणि कामाबद्दल बोललेले जास्त भावते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news