Tv actress Sanchita Ugale Death|कुमकुम भाग्य फेम अभिनेत्री संचिता उगलेने संपवले जीवन, शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल

Tv actress Sanchita Ugale Death|कुमकुम भाग्य फेम अभिनेत्री संचिता उगलेने संपवले जीवन, शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल
Tv actress Sanchita Ugale
Tv actress Sanchita Ugale end of life pudhari photo
Published on
Updated on

कुमकुम भाग्य फेम अभिनेत्री संचिता उगलेची निधनाची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिच्या अचानक जाण्याने टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली असून चाहत्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संचिता उगले नालासोपारा येथील अचोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या कुटुंबासोबत राहत होती. घटनेच्या वेळी ती घरी एकटेच असल्याची माहिती समोर आली.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून चौकशी करण्यात येत आहे.

'दंगल टीव्ही'वरील 'दिलवाली दुल्हनिया ले जाएगी' या मालिकेतील भूमिकेसाठी ती ओळखली जात होती. या मालिकेत तिने अभिनेता सोराब बेदी यांच्यासोबत काम केले होते.

Tv actress Sanchita Ugale
Kareena Kapoor video |करीनाच्या गुलाबी सिल्क सूटची चर्चा! ४२ हजारांच्या ड्रेससोबत ९२ हजारांचे सँडल्स

संचिता उगलेची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट

जीवन संपवण्याच्या काही तास आधी तिने 'राधा' गाण्यावर एक आनंदी 'रील' शेअर केली होती. त्यावर अनेक भावूक प्रतिक्रिया आणि श्रद्धांजलीचे संदेश नेटकरी देत आहेत. ती ३० वर्षांची होती. मृत्यूपूर्वी काही तास आधी तिने केलेली शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होतेय. त्या व्हिडिओमध्ये ती उत्साही, आनंदाने नाचताना आणि मजेत असताना दिसत होती.

या रीलमध्ये, संचिता गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केलेले दिसते. 'इनाम' गाण्यावर लिप-सिंक करताना दिसते. इन्स्टाग्रामवर ही रील शेअर करताना तिने "मैं नाचू तू नाचा..." अशी कॅप्शन लिहिली आहे.

विकी कौशलच्या 'छावा' (Chhaava) या ऐतिहासिक चित्रपटात तिने 'तारा राणी' यांच्या तरुणपणीची भूमिका साकारली होती. तसेच, अभिनेते मनोज बाजपेयी यांची मुख्य भूमिका असलेल्या 'सायलन्स २: द नाईट आउल बार शूटआउट' (Silence 2: The Night Owl Bar Shootout) या चित्रपटातही ती झळकली होती.

Tv actress Sanchita Ugale
Comedian Madhur Virli Apologizes | बलात्कारावरून विनोद करणाऱ्या कॉमेडियन मधुर विरलीचा अखेर माफीनामा; 'खरोखरच दिलगिरी व्यक्त करतो'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news