Comedian Madhur Virli Apologizes | बलात्कारावरून विनोद करणाऱ्या कॉमेडियन मधुर विरलीचा अखेर माफीनामा; 'खरोखरच दिलगिरी व्यक्त करतो'

Comedian Madhur Virli Apologizes | बलात्कारावरून विनोद करणाऱ्या कॉमेडियन मधुर विरलीचा माफीनामा; म्हणाला, खरोखरच दिलगिरी व्यक्त करतो
Comedian Madhur Virli Apologizes
Comedian Madhur Virli Apologizes Pudhari photo
Published on
Updated on
Summary

बलात्कारासारख्या गंभीर विषयावर केलेल्या विनोदामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कॉमेडियन मधुर विरलीने अखेर माफी मागितली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्याने आपल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याची कबुली देत मनापासून दिलगीरी व्यक्त केली. त्याचा हेतू कुणालाही दुखावण्याचा नव्हता, मात्र झालेल्या परिणामांची जबाबदारी स्वीकारत त्याने चाहत्यांची आणि जनतेची माफी मागितली.

स्टँड-अप कॉमेडीच्या क्षेत्रातील ओळखले जाणारे कॉमेडियन मधुर विरली अलीकडेच एका वादग्रस्त विनोदामुळे चर्चेत आले होते. बलात्कारासारख्या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर विषयावर केलेल्या विनोदामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. अनेकांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत तो विनोद असंवेदनशील असल्याचे म्हटले होते. वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर अखेर मधुर विरली यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या निवेदनात मधुर विरली यांनी आपल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याची कबुली दिली. त्यांनी म्हटले की, “माझ्या विनोदामुळे ज्यांना त्रास झाला किंवा ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्यांच्याप्रती मी खरोखरच दिलगिरी व्यक्त करतो. माझा उद्देश कुणाच्याही वेदना कमी लेखण्याचा किंवा अशा गंभीर विषयाची थट्टा करण्याचा नव्हता.”

वादग्रस्त क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. विशेषतः महिलांविरोधातील गुन्हे आणि लैंगिक अत्याचार यांसारख्या विषयांवर विनोद करणे योग्य नसल्याची भूमिका अनेकांनी घेतली. मधुर जो आयआयटी पदवीधर असून आता विनोदवीर आहे. टीका वाढल्यानंतर, त्याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर माफीनामा प्रसिद्ध केला.

दिल्ली येथील या कॉमेडियनने सोशल मीडियावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, सध्या चर्चेत असलेला व्हिडिओ सुमारे दोन वर्षांपूर्वीच्या त्याच्या एका शोमधील आहे. संबंधित भाग सादर केल्यानंतर तो अयोग्य असल्याची जाणीव झाल्याने त्यांनी तो त्याच वेळी काढून टाकल्याचेही त्याने नमूद केले.

मधुर विरलीने आपल्या निवेदनात म्हटले की, विनोदाच्या माध्यमातून विविध कल्पना, सामाजिक प्रश्न आणि कठीण विषयांवर भाष्य करता येते. मात्र, काही विषय हाताळताना संवेदनशीलता, योग्य संदर्भ आणि जबाबदारी आवश्यक असते. एखादा प्रयत्न अपेक्षेप्रमाणे यशस्वी न ठरल्यास चूक स्वीकारणे, माफी मागणे आणि त्यातून शिकणे हाच योग्य मार्ग असतो.

तसेच, आपले इन्स्टाग्राम खाते अलीकडे नव्हे तर सुमारे सहा महिन्यांपूर्वीच निष्क्रिय केल्याचे त्यांने सांगितले. शेवटी त्याने आपल्या वक्तव्यामुळे दुखावलेल्या व्यक्तींची मनापासून माफी मागितली.

Comedian Madhur Virli Apologizes
Kareena Kapoor video |करीनाच्या गुलाबी सिल्क सूटची चर्चा! ४२ हजारांच्या ड्रेससोबत ९२ हजारांचे सँडल्स

एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देताना म्हटले की, धक्कादायक विषय मांडणे आणि त्यातून हशा मिळवण्याचा प्रयत्न करणे हे विनोदाचे कौशल्य ठरत नाही.

या प्रकरणानंतर सोशल मीडियावर विनोदाच्या मर्यादा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी यावर व्यापक चर्चा सुरू झाली. विशेषतः लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि महिलांविरोधातील गुन्ह्यांसारख्या गंभीर विषयांवर विनोद करणे कितपत योग्य आहे, याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Comedian Madhur Virli Apologizes
Mouni Roy Breaks Silence|'माझी गर्लफ्रेंड्स सर्वात बेस्ट, मी 'समलिंगी नाही...; टीका करणाऱ्यांना मौनी स्पष्टच बोलली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news