Kareena Kapoor video |करीनाच्या गुलाबी सिल्क सूटची चर्चा! ४२ हजारांच्या ड्रेससोबत ९२ हजारांचे सँडल्स

Kareena Kapoor video |करीनाच्या गुलाबी सिल्क सूटची चर्चा! ४२ हजारांच्या ड्रेससोबत ९२ हजारांचे सँडल्स
Kareena Kapoor video
Kareena Kapoor at aamir khan production 25 years completed bash pudhari photo
Published on
Updated on

आमिर खान प्रोडक्शन ला २५ वर्षांच्या प्रवासानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात करीना कपूर खानने आपल्या आकर्षक आणि एलिगंट लूकने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मुंबईत झालेल्या विशेष स्क्रीनिंग सोहळ्यात आमिर खान, सलमान खान यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांनी उपस्थिती लावली.

यावेळी करीनाने गुलाबी रंगाचा पारंपरिक सिल्क सूट परिधान केला होता. हा पोशाख एकाया बनारसच्या कलेक्शनमधील असल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल ४१,९७५ रुपये किंमतीच्या या सूटची प्रेरणा प्रसिद्ध चित्रकार Amrita Sher-Gil (अमृता शेर-गिल) यांच्या कलाकृतींमधून घेण्यात आली होती.

या ड्रेसवर हाताने विणलेले बनारसी कटवर्क नक्षीकाम करण्यात आले होते. मऊ रेशमी कापड आणि सुंदर डिझाईन, घेरदार कुर्ता, स्ट्रेट पँट आणि ट्रान्सपरंट दुपट्टामुळे तिचा लूक अधिक खुलून दिसला.

यावर तिने एका लक्झरी ब्रँडच्या सॅटिन हील्सची निवड केली होती. या नक्षीदार सँडल्सची किंमत सुमारे ९२ हजार रुपये असल्याचे सांगितले जाते. हँडमेड या सँडल्समुळे तिचा लूक अधिक ग्लॅम दिसला. करीनाने झुमके, न्यूड टोन मेकअप आणि गडद काजळने आपला पारंपरिक लूक पूर्ण केला. सुमारे १.३ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या या स्टायलिश लूकमुळे करीना कपूर पुन्हा एकदा र्चेचा विषय ठरली.

Kareena Kapoor video
Mouni Roy Breaks Silence|'माझी गर्लफ्रेंड्स सर्वात बेस्ट, मी 'समलिंगी नाही...; टीका करणाऱ्यांना मौनी स्पष्टच बोलली

दरम्यान, आमिर खान मैत्रीण गौरी स्प्रॅट सोबत कार्यक्रमाला हजर राहिले. दोघांनी एकत्र फोटो पोझेस देखील दिल्या. या सोहळ्यात इम्रान कान देखील त्याची गर्लफ्रेंड Lekha Washington हिच्यासोबत उपस्थित होता. साडीतील लेखाचा मोहक लूक विशेष लक्षवेधी ठरला. या कार्यक्रमाला आमिर खानची एक्स पत्नी किरण रावने मुलगा आजाद सोबता हजेरी लावली. आमिर आणि किरण यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध आजही कायम आहेत.

(video- viralbhayani Instagram वरून साभार)

याशिवाय आशुतोष गोवारीकर त्यांच्या पत्नीसह आले. सनी देओल त्याचा मुलगा करण देओल आणि राजवीरदेओल सोबत उपस्थित होता. काळ्या रंगाच्या सूटमध्ये दोन्ही भावडांनीही फोटो पोझ दिली.

Kareena Kapoor video
Jahnavi Killekar | कुणी तरी येणार येणार गं..सुरज-संजना डोहाळे जेवण; जान्हवीने निभावलं अतुट नातं, व्हिडिओ व्हायरल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news