Tunisha Sharma Case: शीझानच्या ‘सिक्रेट’ गर्लफ्रेंडशी डिलीट केलेली चॅट पुन्हा मिळाले

Actress Tunisha Sharma
Actress Tunisha Sharma

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबर रोजी आपले जीवन संपवले होते. तिच्या मृत्यूनंतर तिचा कथित बॉयफ्रेंड शीझान याने त्‍याच्‍या सिक्रेट गर्लफ्रेंडशी सुमारे एक तास चाट केलं होतं. त्यानंतर शीझानने हे चॅट डिलिट केले होते. आता पोलिसांना सीक्रेट गर्लफ्रेंडशी केलेले चॅट पुन्हा मिळवले आहेत.

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शीझानच्या सिक्रेट गर्लफ्रेंडचा फोन पोलिसांनी जप्त केला आहे. शीझान व त्‍याच्‍या सिक्रेट गर्लफ्रेंडने एक तास चॅट केले. यानंतर ते फोनवरुन डिलीट केलं होतं. आता ते पोलिसांनी पुन्हा मिळवले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सिक्रेट गर्लफ्रेंडचा जबाबदेखील नोंदवला आहे.

अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, शीझानने दोघांचे चॅट डिलीट केलं होतं, त्यातील एक भाग पुन्हा मिळवण्यात यश आलं आहे. तसेच शीझान सिक्रेट गर्लफ्रेंडशिवाय अनेक मुलींशी फोनवर बोलत होता, अशीही माहिती तपासात समोर आली आहे.  शीझान खान सध्‍या न्यायालयीन कोठडीत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news