Eetha clash Toxic box office | यशच्या 'टॉक्सिक'ची रिलीज डेट निश्चित; श्रद्धा कपूरच्या 'ईठा'सोबत होणार 2026 मधील सर्वात मोठी बॉक्स ऑफिस लढत

Eetha clash Toxic box office | यशच्या 'टॉक्सिक'ची रिलीज डेट निश्चित; श्रद्धा कपूरच्या 'ईठा'सोबत होणार 2026 मधील सर्वात मोठी बॉक्स ऑफिस लढत
Eetha clash Toxic box office
Eetha clash Toxic box office pudhari photo
Published on
Updated on
Summary

यश अभिनित बहुप्रतिक्षित पॅन-इंडिया चित्रपट 'टॉक्सिक' 28 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या प्रदर्शनामुळे श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटासोबत मोठी बॉक्स ऑफिस टक्कर निश्चित झाली आहे. दोन्ही चित्रपटांविषयी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता असून, हा संघर्ष 2026 मधील सर्वात चर्चेचा आणि महत्त्वाचा बॉक्स ऑफिस क्लॅश ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

clash between toxic and eetha movie on box office

साऊथ अभिनेता यशच्या बहुप्रतीक्षित 'टॉक्सिक' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर अधिकृतपणे निश्चित झाली आहे. हा पॅन-इंडिया अॅक्शन ड्रामा आता २६ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. रॉकिंग स्टार यशचा ॲक्शन चित्रपट 'टॉक्सिक: अ फेअरिटेल फॉर ग्रोन-अप्स' प्रदर्शित होत अशतानाच आता आणखी एका चित्रपटाचा आमना-सामना या चित्रपटाला करावा लागणार आहे.

Eetha clash Toxic box office
Who is Sanskruti Jayana | कोण आहे 'कृष्णावतारम पार्ट 1'ची संस्कृती जयाना? गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याशी आहे खास नातं

गीतू मोहनदास दिग्दर्शित या चित्रपटाच्या जागतिक प्रदर्शनाची पुष्टी यशच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून करण्यात आली. बहुप्रतीक्षित प्रोजेक्टची निर्मिती केव्हीएन प्रोडक्शन्सने केली असून, यात कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांसारखे दिग्गज कलाकार आहेत.

'टॉक्सिक'च्या प्रदर्शनाच्या शेड्यूलमध्ये बदल

चित्रपटाच्या रिलीज शेड्यूलमध्ये अनेक वेळा बदल झाले. आधी हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार होता. नंतर ही तारीख बदलून ४ जून २०२६ करण्यात आली. पण नंतर निर्मात्यांनी आणखी बदल केला. आता गीथू मोहनदास दिग्दर्शित 'टॉक्सिक: अ फेअरिटेल फॉर ग्रोन-अप्स' चित्रपट २६ ऑगस्ट रोजी रिलीज होतोय. या रीलिज डेटसोबतच निर्मात्यांनी चाहत्यांना आणखी एक मोठे सरप्राईज दिले आहे. त्यांनी या चित्रपटातून यशचा 'डबल अवतार' असलेला लूक रीलिज केला आहे. यामध्ये यशचे दोन वेगवेगळे लुक्स पाहायला मिळत असून, एका पात्राचे नाव 'राया' आणि दुसऱ्या पात्राचे नाव 'तिकीट' असे आहे. यशचे हे दोन्ही लुक्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

यशने पोस्टर केले शेअर

व्हायरल झालेल्या पोस्टरमध्ये यश एका ठळक लाल रंगाच्या बॅकग्राऊंडवर दिसत आहे. या फोटोसोबतच, अभिनेत्याने अधिकृत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. यशने लिहिले, "आपल्या वडिलांचा सन्मान करा... #टॉक्सिक जगभरातील चित्रपटगृहांमध्ये २६-०८-२०२६ पासून. #टॉक्सिकदमुव्ही."

Eetha clash Toxic box office
Deool Band 2 Box Office Collections Week 4 |'देऊळबंद-२'ची बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई; ९० कोटींच्या दिशेने घोडदौड, प्रवीण तरडेंची खास पोस्ट व्हायरल

आता थेट टक्कर श्रद्धा कपूरच्या 'ईठा'शी

विशेष म्हणजे, 'टॉक्सिक'ची थेट टक्कर अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या आगामी 'ईठा' चित्रपटासोबत होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कणाची चलती चालणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. 'ईठा'लाही प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद आहे. श्रद्धाचा एका वेगळा चाहता वर्घ अशून त्यांच्यात ईठाबाबत उत्सुकता आहे. बॉक्स ऑफिसवर दोन स्टार्सची लढत पाहायला मिळेल. श्रद्धाचा ईठा हा चित्रपट २८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चरित्रात्मक चित्रपट असून श्रद्धा कपूर ही प्रसिद्ध मराठी लोककलाकार आणि लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news