Who is Sanskruti Jayana | कोण आहे 'कृष्णावतारम पार्ट 1'ची संस्कृती जयाना? गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याशी आहे खास नातं

Who is Sanskruti Jayana | कोण आहे 'कृष्णावतारम पार्ट 1'ची संस्कृती जयाना? गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याशी आहे खास नातं
Sanskruti Jayana
Sanskruti Jayanapudhari photo
Published on
Updated on

संस्कृती जयाना ही एक उदयोन्मुख अभिनेत्री आहे, जी 'कृष्णावतारम - भाग १' या पौराणिक महाकाव्य चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिने सत्यभामाची भूमिका साकारली असून या माध्यमातून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केलीय. राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या तिच्या बॉलिवूड पदार्पणामुळे राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेकांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले आहे.

तिच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी :

संस्कृती जयाना ही गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या विद्यमान राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची नात आहे. नेटकरी म्हणताहेत की, तिच्या पहिल्याच चित्रपटात तिला 'सत्यभामा'सारखे अत्यंत भावनिक आणि पौराणिक पात्र साकारण्याची तिला संधी मिळाली, ज्यासाठी तिच्या अभिनयाचे आणि अभिजात सौंदर्य चर्चेत आहे. तिची आजी, आनंदीबेन पटेल यांनीही तिच्या शानदार पदार्पणाचे आणि अभिनयाचे कौतुक केले आहे आणि तिच्या भूमिकेचे प्रशंसा केली आहे. संस्कृतीची आई अनर पटेल सोशल एंटरप्रेन्योर आणि वडील जयेश पटेल समाजसेवेत सक्रीय आहेत.

चित्रपट निर्माते हार्दिक गज्जर यांच्या 'कृष्णावतारम पार्ट १: द हार्ट' चित्रपटात ती 'सत्यभामा' भूमिकेत दिसेल. या चित्रपटाने जगभरात ५५ कोटींहून अधिक कलेक्शन केलं आहे.

'कृष्णावतारम पार्ट १' विषयी

भगवान श्री कृष्ण यांच्या जीवनावर आधारित एक शानदार Mythological हा चित्रपट असून ७ मे ला चित्रपटगृहात रिलीज झाला होता. या चित्रपटाची खासियत म्हणजे यामध्ये भगवान कृष्ण यांची कहाणी सत्यभामा यांच्या दृष्टीकोणातून दाखवण्यात आले आहे.

ही कथा लेखक राम मोरी यांच्या २०२५ ची कादंबरी 'सत्यभामा'वर आधारित आहे. तीन भागांत विभागलेल्या या चित्रपटाचा हा पहिला भाग आहे. पहिल्या भागात राधा, रुक्मिणी आणि सत्यभामा सोबत भगवान कृष्ण यांचे नाते आणि प्रेम दर्शवण्यात आले आहे.

मुख्य कलाकार आणि भूमिका

सिद्धार्थ गुप्ता: भगवान श्री कृष्ण

संस्कृती जयाना: सत्यभामा

सुष्मिता भट्ट: राधा

निवासिनी कृष्णन: रुक्मिणी

Sanskruti Jayana
Suhasini Mulay | लग्नाला वयाची अट नाही! ६० वर्षे सिंगल राहिली 'लगान'ची ही अभिनेत्री, आता फेसबुक फ्रेंडशी केलं लग्न

जॅकी श्रॉफ, दीपक डोबरियाल, आशुतोष राणा, कुमुद मिश्रा, गोविंद नामदेव यासारखे दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन हार्दिक गज्जर यांनी केले आहे. प्रसाद एस. यांचे संगीत आहे.

Sanskruti Jayana
Ranveer Singh Big Decision|'Don 3 च्या वादानंतर रणवीर सिंहने घेतला मोठा निर्णय, १८ महिने हे काम अजिबात करणार नाही'

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी संस्कृतीने फॅशन मॅनेजमेंट आणि बिझनेसचे शिक्षण घेतले. तिने लंडनमधील RADA, न्यूयॉर्क फिल्म अकादमी आणि Lee Strasberg Theatre and Film School यांसारख्या संस्थांमध्ये अभिनय व नृत्याचे प्रशिक्षणही घेतले आहे. वयाच्या 16व्या वर्षी तिने स्वतःचा फॅशन ब्रँड सुरू केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news