

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळबंद २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यात चित्रपटाने ८० कोटींहून अधिक कमाई केली असून ९० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर आहे. मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये स्थान मिळवलेल्या या सिनेमामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याचदरम्यान प्रवीण तरडे यांची एक खास पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे
Pravin Tarde's film Deool band 2 remark Week 4 collection on box office
प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळबंद २’चा बॉक्स ऑफिसवरील विजयाचा प्रवास अद्यापही कायम आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर चार आठवडे उलटून देखील चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून तुफान कमाई होत आहेत. लवकरच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असे म्हटले जात आहे.
मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बाब ठरलेल्या या चित्रपटाने आता ९० कोटी रुपयांच्या टप्प्याकडे वेगाने वाटचाल सुरू केली आहे. रिपोर्टनुसार, ‘देऊळबंद २’ने २६ दिवसांत ८४ कोटी रुपयांहून अधिक जागतिक कमाई केली होती. त्यानंतरही चित्रपटाची घोडदौड सुरूच राहिली असून २८ व्या दिवसापर्यंत त्याचे एकूण कलेक्शन ८१ ते ८५ कोटी रुपयांच्या दरम्यान पोहोचले आहे.
चित्रपटाने चौथ्या आठवड्यात ६.२५ कोटींची कमाई केली. भारतीय बॉक्स ऑफिसवरील एकूण कमाई आता ८२.७५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट पाचव्या आठवड्यात 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या एकूण कमाईत मागे टाकेल, असे म्हटले जात आहे.
मोहन जोशी, स्नेहल तरडे, प्रवीण तरडे, महेश मांजरेकर तसेच अन्य कलाकारांची भूमिका आहेत. या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे.
प्रवीण तरडे यांची इन्स्टा पोस्ट व्हायरल
'देऊळ बंद २' ला भरभरून प्रेम दिल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. तुमच्या आशीर्वाद, प्रेम आणि पाठिंब्यामुळे हा चित्रपट यशाच्या नव्या शिखरावर पोहोचला आहे. हे यश माझ्यासाठी केवळ आकडेवारी नाही, तर मराठी संस्कृती, मराठी चित्रपटसृष्टी आणि स्वामी भक्तांच्या अढळ श्रद्धेचा विजय आहे. आपले प्रेम आणि विश्वास असेच कायम राहू द्या.
‘देऊळबंद २’ ची सध्याची कमाई पाहता लवकरच ९० कोटींचा टप्पा चित्रपट पार करेल. बॉक्स ऑफिसवरील ही घोडदौड किती दूरपर्यंत जाते, याकडे आता संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.