Urfi Javed Abusive Messages | 'द ट्रेटर्स' जिंकल्यानंतर उर्फी जावेदला असभ्य भाषेत धमक्या, आक्षेपार्ह मेसेज

The Traitors Winner Urfi Javed-Nikita Luther | 'या' दोन्ही सेलिब्रिटी बनल्या 'द ट्रेटर्स'च्या विजेत्या, ट्रॉफीसोबत मिळाली इतकी रक्कम
image of Urfi Javed
The Traitors Winner Urfi JavedInstagram
Published on
Updated on

मुंबई - करण जोहरचा रिॲलिटी शो द ट्रेटर्सचा फिनाले ३ जुलैला प्राईम व्हिडिओवर झाला. यामध्ये विजेत्यांची घोषणा करण्यात आली. सोबत प्राईज मनीदेखील देण्यात आली. द ट्रेटर्सच्या पहिल्या सीजनची विजेती उर्फी जावेद आणि निकिता लूथर आहे. त्यांना प्राईज मनी म्हणून ७०.०५ लाख रुपये मिळाले आहेत. उर्फी - निकिताने आपल्या स्मार्ट गेमन ट्रेटर पूरब झा ला मात दिली. दुसरीकडे उर्फी जावेदने हा सो जिंकल्यानंतर तिला आक्षेपार्ह धमक्या मिळत आहेत. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे.

निकिता -उर्फीने ट्रेटर्सला केलं एक्सपोज

फिनाले वेळी निकिता - उर्फी ट्रेटर्सना एक्सपोज करतात. शो च्या फिनाले एपिसोडमध्ये मजेदार ट्विस्ट पाहायला मिळालं होतं. शो च्या टॉप ४ कंटेस्टेंटमध्ये उर्फी, हर्ष, सुधांशु पांडे, निकिता होते.

image of Urfi Javed
Money Laundering Case | सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरण; Jacqueline Fernandez ला दिलासा नाहीच; दिल्ली हायकोर्टाने फेटाळली याचिका

अन्य ३ यांच्या माध्यमातून सुधांशु पांडेला वोट आऊट केलं होतं. शो दरम्यान काही पार्टिसिपेंट्सना सीक्रेटपणे ट्रेटर्स बनवण्यात आलं होतं. त्यांचं काम होतं इनोसेंट्स लोकांना संपवणं. प्रत्येक ट्रेटरना इनोसेंट्स एलिमिनेट करू शकत होते तर त्यांना रिवॉर्ड मिळायचं. जर एक ट्रेटर वाचला असता तर तो विजेता ठरला असता. शोमध्ये साहिल सलाथिया, करण कुंद्रा, राज कुंद्रा, महीप कौर, रफ्तार सूफी मोतिवाला, मुकेश छाबडा, आशीष विद्यार्थी, जन्नत जुबैर, एल्नाज नोरौजी, अपूर्व मुखिजा, जानवी गौर, अंशुला कपूर हे स्पर्धक म्हणून एन्ट्री झाली होती.

image of Urfi Javed
Surabhi Samriddhi | चिंकी-मिंकीची जोडी अखेर का तुटली? इन्स्टाग्रामवरील पोस्टने वेधलं लक्ष
Instagram

उर्फीला धमक्यांनी भरलेले मेसेज, असभ्य भाषेत धमक्या

उर्फीने इन्स्टाग्राम स्क्रिनशॉट्स शेअर करून मोठी पोस्ट लिहिलीय. तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय- ''जेव्हा आपल्याला एखाद्या मुलीने केलेले काही आवडत नाही, तेव्हा फक्त 'R' हा शब्द सोडून द्या. मला अशा प्रकारची धमकी किंवा गैरवापर पहिल्यांदाच झाला नाही पण यावेळी ते माझ्या कपड्यांमुळे नाही तर मी शो जिंकल्यामुळे आहे. कल्पना करा की तुम्ही इतके क्षुद्र आहात की जेव्हा तुमचा आवडता खेळाडू जिंकत नाही तेव्हा तुम्ही शिवीगाळ आणि धमक्या देण्यास सुरुवात करता. हे मी अपलोड केलेले सर्वात चांगले व्हिडिओ आहेत. मी काहीही केले तरी लोकांना फक्त द्वेष करणे आणि गैरवापर करणे आवडते. हर्ष को ना निकलती तो प्यार में आंधी, हर्ष को निकाल दिया तो धोखेबाज. पुरव को जीतने देती तो बेवकूफ, नही जीतने दिया तो चीटर. द्वेषाने मला आधी कधीही थांबवले नाही, आताही कधीही थांबवणार नाही.''

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news