

Delhi High Court dismisses Jacqueline Fernandez’s plea
नवी दिल्ली -दिल्ली हायकोर्टाने गुरुवारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) अंमलबजावणी संचालनालयाच्या तक्रारीला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली. जॅकलिन फर्नांडिसला मोठा धक्का बसला आहे. कारण दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंगची तक्रार रद्द करण्याची तिची विनंती याचिका फेटाळलीय. रिपोर्टनुसार, मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) तिच्या आव्हानात तथ्य नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
महाठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये जॅकलिन विरोधात दाखल झालेले FIR रद्द करण्याची मागणी केली होती. हाऊसफुल ५ मधील या अभिनेत्रीने तिच्याविरुद्ध ईडीचा खटला रद्द करण्याची मागणी केली होती. जॅकलीनची ही विनंती याचिका न्यायाधीश अनीश दयाल यांनी फेटाळली. न्यायालयाने नमूद केले की, विशेष न्यायालयाने आधीच आरोपपत्राची दखल घेतली आहे.
याचिका दाखल करताना, जॅकलीनने तिच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले होते. सुकेश चंद्रशेखरसोबतच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या चर्चेलाही नकार दिला होता. जॅकलिनने याचिका दाखल केली की, तिच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. केवळ सुकेश चंद्रशेखरनेच तिची फसवणूक केली नाही तर आदिती सिंगनेही फसवणूक केली आहे. जॅकलीन म्हणाली की, सुकेश चंद्रशेखरने तिला लक्ष्य केले होते आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात तिची कोणतीही भूमिका नव्हती. जॅकलिनने सुकेश चंद्रशेखरशी संबंध असल्याचा दावा फेटाळून लावला आहे.
सुकेश चंद्रशेखरशी संबंधित ईडीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचे नाव आरोपी म्हणून आहे. ती चौकशीसाठी अनेक वेळा हजर राहिली आहे. जॅकलिनने सुकेशच्या तिच्याशी प्रेमसंबंध असल्याचा दावा फेटाळून लावला आणि न्यायालयात सांगितले की, मनी लाँड्रिंगच्या कारवायांमध्ये तिचा कोणताही सहभाग नव्हता आणि ती एक पीडित होती, कट रचणारी नाही.
जॅकलिनची गणना बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते आणि ती अलिकडेच तिच्या 'हाऊसफुल-५' या चित्रपटामुळे चर्चेत आली होती. या चित्रपटात जॅकलिनने मुख्य भूमिका साकारली आहे.