The 50 Winner: Reality Show स्टार शिव ठाकरेच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा... चुसरशीच्या फिनालेनंतर जिंकलं द ५० चं विजेतेपद?

Shiv Thakare
Shiv Thakarepudhari photo
Published on
Updated on

Shiv Thakare The 50 Reality Show Winner: १ फेब्रुवारीपासून द ५० हा रियलिटी शो सुरू होता. यामध्ये ५० सेलिब्रेटींनी सहभाग घेतला होता. त्याचे शूटिंग आता संपलं आहे. जेव्हापासून लाँच झाला तेव्हापासूनच हा चर्चेत राहिला आहे. या शो चा ग्रँड फिनाले १९ फेब्रुवारी रोजी मुंबईत झाला होता. यामध्ये मिस्टर फैसू, इमॉर्टल काका, कृष्णा श्रॉफ आणि शिव ठाकरे हे ४ स्पर्धक अंतिम फेरीत पोहचले होते. या चौघांमधील कोणाला विजेतेपद मिळालं हे आता बाहेर आलं आहे. मिळालेल्या ताज्या बातमीनुसार शिव ठाकरे हा विजेता ठरला आहे.

Shiv Thakare
Reality Show Update: अशनीर ग्रोव्हरच्या रिअलिटीशो ने कपिल शर्माच्या शोला टाकले मागे? जाणून घ्या सत्य

टाईम्स ऑफ इंडिया टीव्हीला सेटवरून मिळालेल्या माहितीनुसार शिव ठाकरे हा या शोचा विनर ठरला आहे. मात्र असं असलं तरी निर्मात्यांनी एका विनरची घोषणा करण्याऐवजी विजयी क्षणाचे चारही फायनलिस्टसोबत सोबत शूटिंगि केलं आहे. त्यांना विजेता कोण हे गुलदस्त्यात ठेवायचं असल्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या शोचा विजेता हा २२ मार्च रोजी घोषित करण्यात येणार आहे.

Shiv Thakare
Diwali Padwa Buffalo Road Show | हलगीचा आवाज, ढोल–ताशांचा नाद अन् नटलेल्या म्हशींचा थाट: कासेगावात रंगला पारंपरिक फॅशन शो

सेटवरील माहिती आली समोर

द ५० या शोमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फायनलमध्ये पाचवा स्पर्धक रजत दलाल याची एक्झिट थाली आहे. यानंतर मिस्ट फैसू, इमॉर्टल काका, कृष्णा श्रॉफ आणि शिव ठाकरे हे चार स्पर्धक उरले होते. त्यांनी विजेतेपदासाठी लढले. आयोजकांनी फानालेसाठी पझल टास्क ठेवला होता. यात टायमिंगची अत्यंत महत्वाची भूमिका होती. यात प्रत्येक स्पर्धकाला हे कोडं स्वतः सोडवायचं होतं. इतर तीन स्पर्धकाना जो स्पर्धक हा टास्क करत होता त्याला पाहण्याची परवानगी नव्हती.

Shiv Thakare
New TV serial | 'नवरी मिळे हिटलर'ला नंतर लीलाची आणखी एक मालिका, वल्लरीला कशी मिळाली भूमिका?

शिव ठाकरे टास्कमध्ये पहिला मात्र...

इमॉर्टल काकांनी पहिल्यांदा हा टास्क केला. त्यांना पझल सोडवण्यात यश आलं नाही. नंतर कृष्णा श्रॉफनं हे पझलं सोडवण्याचा प्रयत्न केला. तिनं हे कोडं २५ मिनिटात सोडवलं. त्यानंतर शिव ठाकरेने १० मिनिटात हा टास्क पूर्ण केला. सर्वात शेवटी मिस्टर फैसू यांनी हा टास्क परफॉर्म केला. सुरूवातीला त्यानं पझल चुकीच्या पद्धतीनं पूर्ण केलं. त्यानंतर लायनने त्याला तुम्ही टास्क व्यवस्थित केलेला नाही असं सांगितलं. त्यानंतर त्यानं पुन्हा टास्ट परफॉर्म केला अन् तो १४ मिनिटात पूर्ण केला.

Shiv Thakare
Yash Toxic Teaser: ‘टॉक्सिक’चा टीझर रिलीज! यशचा खतरनाक अवतार; विलनची झलक एकदा पाहाचं, चाहत्यांमध्ये तुफान क्रेझ

शोमध्ये मोठा ट्विस्ट

टास्क पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ पाहता शिव ठाकरे हा विजेता ठरतो. मात्र निर्मात्यांनी यामध्ये एक सप्राईज ट्विस्ट आणलं. त्यामुळं सर्व स्पर्धांना धक्का बसला. त्यांनी सर्व विजेत्या स्पर्धकांसोबत विजयाच्या क्षणाचे शूटिंग केले. यामुळं विजेता कोण याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली.

शिव ठाकरेसाठी रिअलिटी शो काही नवीन नाहीये. त्याने यापूर्वी रोडीज, बिग बॉस मराठी, बिग बॉस हिंदू, झलक दिखला जा आणि आता द ५० हे रिअलिटी शो केले आहेत. द ५० या शोमध्ये टीव्ही जगतातील काही मोठी नावं होती. यात करण पटेल, उर्वशी ढोलकिया, युविका चौधरी, रिद्धी डोग्रा, प्रिन्स नरूला, रिद्धिमा पंडित, दिव्या अग्रवाल, रजत दलाल, निक्की तांबोळी या स्टार्सचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news