

रिअलिटी शोचे स्वत:चे असे खास जग आहे. आपल्या लाडक्या सेलिब्रिटीला त्याच्या नेहमीपेक्षा हटके रूपात पाहणे प्रेक्षकांना अत्यंत आवडत आहे असेही या शोजच्या लोकप्रियतेवरुन दिसून येते. नुकताच दोन रिअलिटी शोमध्ये स्पर्धा सुरू असल्याचेही दिसून येत आहे. यापैकी एक आहे कपिल शर्माचा शो आणि दूसरा आहे भारत पे चे माजी फाऊंडर अशनीर ग्रोव्हरचा नवीन शो राईज अँड फॉल. (Latest Entertainment News)
रिपोर्टसनुसार अशनीरच्या तुलनेत कपिलच्या शोमधील त्याच त्याच फॉरमॅटला प्रेक्षक काहीसे कंटाळले आहेत. त्या तुलनेत अशनीरच्या शोने चांगला प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. विशेष म्हणजे बिग बॉसलाही अशनीरच्या शोने मागे टाकले आहे.
कपिलचा शो जेव्हा ओटीटीवर आला तेव्हा प्रेक्षक खूप जास्त आनंदी होते. पण ओटीटीवर हा शो म्हणावा तितका यशस्वी होताना दिसत नाही. त्या तुलनेत हा शो टीव्हीवर दिसत असताना प्रेक्षकवर्ग बराच जास्त होता. याची अनेक कारणे सांगितली जात आहेत. शोचा फॉरमॅट जवळपास टीव्हीवर असलेल्या फॉरमॅटसारखाच आहे. त्यात नवीन काहीच नसल्याने हा शो आता कंटाळवाणा होऊ लागल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
शार्क टॅंकमध्ये आपल्या हटके शैलीने प्रकाशझोतात आलेल्या अशनीर ग्रोव्हरने आता एका नव्या रिअलिटी शोमध्ये पदार्पण केले आहे. राईज अँड फॉल हा गेमचा एक नवा फॉरमॅट आहे. यामध्ये काही स्पर्धक राजासारखे ऐशोआरामात असणार तर काही सेवकांच्या रूपात. या दोन वेगवेगळ्या घटकांचा प्रवास आणि कुरघोडी या शोमध्ये पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये अर्जुन बिजलानी, धनश्री वर्मा, कीकू शारदा, आदित्य नारायण, पवन सिंह, कुब्रा सैत, नयनदीप रक्षित, अरबाज़ पटेल, आरुष भोला, आहना कुमरा, संगीता फोगट, अनाया बांगर, बाली, आकृति नेगी. नूरिन शा हे या शोचे स्पर्धक आहेत