Malaika Arora new item song : तिशीतल्या रश्मिकावर भारी पडली पन्नाशीतील मलाइका; हटके डान्सने केले सगळ्यांना घायाळ

त्या गाण्यात प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांनी मलायका नृत्याचे जलवे दाखवते आहे
Entertainment
मलायका आयटम सॉन्ग Pudhari
Published on
Updated on

आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका असलेल्या थामाबाबत आता एक नवीन अपडेट समोर येते आहे. या सिनेमातील नवे गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अर्थात त्या गाण्यात प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांनी मलायका नृत्याचे जलवे दाखवते आहे.

अर्थात या गाण्यात तिच्यासोबत रश्मिकाही दिसते आहे. पण पन्नाशीतील मलाइका या गाण्यात रश्मिकावर भारी पडताना दिसते आहे. न्यूड कलरचा शिमर ड्रेस आणि मोकळे केस यात ती कमालीची खास दिसते आहे. (Latest Entertainment News)

13 तासातच या गाण्याला युट्यूबवर 39 लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. पॉइझन बेबी असे बोल असलेल्या गाण्यात या दोघींच्या डान्सने धमाल उडवून दिली आहे. या गाण्याला जॅस्मिन सॅंडलस, सचिन - जिगर आणि दिव्य कुमारने गायले आहे.

या सिनेमातील हे दुसरे आयटम सॉन्ग

यापूर्वी थामाचे गाणे 'दिलबर की आंखो का' हे रिलीज झाले होते. या गाण्यात नोरा फातेही दिसली होती. या गाण्याला रश्मित कौर आणि जिगर सरैय्या यांनी आवाज दिला होता. याचे बोल प्रसिद्ध गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले होते

Entertainment
Nita Ambani Birkin Bag: नीता अंबानी पार्टीत दिसल्या जगातील सगळ्यात महागड्या बॅगसोबत; किंमत माहिती आहे का?

थामाविषयी....

थामा हा एक रोमॅंटिक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. जो मडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्स या सिरिजमधला पाचवा सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदारने केले आहे. या सिनेमातून रश्मिका आनुई आयुष्मान पहिल्यांदाच स्क्रीन शेयर करताना दिसणार आहे. याशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावलदेखील या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news