डिझायनर मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीची सगळीकडे चर्चा आहे.पण या पार्टीमध्ये सगळा लाईम लाइट होता तो नीता अंबानी आणि त्यांच्या बॅगवर..नीता अंबानी यांनी मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेली ग्रे आणि सिल्व्हर सिक्वेन साडी परिधान केली होती.तसे आपला लूक पूर्ण करण्यासाठी त्यांनी हार्ट-शेप्ड कोलंबियन पन्ना असलेले कानातले घातले होते.एक खास मिनी बॅग देखील कॅरी केली होती, ज्याची चर्चा सर्वत्र आहे..ती मिनी बॅग म्हणजे हर्मीस स्पेशल एडिशन मिनी बिर्किन बॅग आहे..ही बॅग हर्मीसची सर्वात मौल्यवान आणि दुर्मिळ (Rare) मिनी पर्स आहे..या पर्सला सॅक बिजौ बिर्किन (Sac Bijou Birkin) या नावाने ओळखले जाते आणि ती २०१२ मध्ये खास डिझाइन करण्यात आली होती..या पर्सची किंमत जवळपास १७ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे या मिनी पर्समध्ये २७१२ हिरे जडलेले आहेत