Who is Thalapthy Vijay Wife Sangeetha|सिनेस्टारवर जीव ओवाळणारी चाहतीच झाली पत्नी! थलपति विजयची पत्नी संगीता आहे तरी कोण?

Thalapthy Vijay Wife Sangeetha| फॅन ते लाईफ पार्टनर, थलपति विजयची पत्नी संगीता आहे तरी कोण? जाणून घ्या कशी झाली होती लव्ह स्टोरीला सुरुवात?
Thalapthy Vijay- Sangeetha
Who is Thalapthy Vijay Wife Sangeethafile photo
Published on
Updated on
Summary

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजयची पत्नी संगीता ही एकेकाळी विजयच्या अभिनयाची चाहती होती. संगीता त्यांच्या एका चित्रपटानंतर त्यांना भेटली आणि त्यांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. दोघांनी १९९९ मध्ये विवाह केला.त्यांना दोन मुले आहेत. त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात कशी झाली?

Who is Thalapthy Vijay Wife Sangeetha love story

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता थलपति विजयआणि त्याची पत्नी संगीता (Sangeetha Sornalingam) मूळची श्रीलंकेतील तमिळ कुटुंबातील असून ती लंडनमध्ये जन्म आणि बालपण गेले. विजयच्या अभिनयाच्या ती मोठी चाहती होती. तिचे वडील एक प्रसिद्ध तमिळ उद्योगपती होते. नंतर ते लंडनमध्ये स्थायिक झाले. संगीता कधीच स्टारडमच्या मागे लागली नाही आणि तिने स्वत:ला लाईमलाईटपासून दूर ठेवले.

१९९० च्या दशकात विजयचा चित्रपट पाहिल्यानंतर ती त्याला प्रत्यक्ष भेटण्यासाठी भारतात आली होती. चित्रपटाच्या यशानंतर आयोजित एका कार्यक्रमात त्यांची पहिली भेट झाली. संगीताचा साधेपणा आणि प्रामाणिक स्वभाव विजयला आवडला.

Thalapthy Vijay- Sangeetha
Thalapathy Vijay divorce case | थलपति विजयच्या पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज दाखल, विवाहबाह्य संबंधाचा आरोप?

मैत्रीचे रुपांतर प्रेमात

पहिल्या भेटीनंतर दोघांमध्ये संवाद वाढत गेला. त्याने आपल्या घरच्या मंडलींना तिच्याबद्दल सांगितलं. विजयचे कुटुंबीय संगीताच्या कुटुंबीयांना भेटायला लंडन गेले. सुरुवातीला ही फक्त चाहती आणि कलाकार यांच्यातील ओळख होती; मात्र वेळेनुसार मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांच्या कुटुंबियांनीही या नात्याला पाठिंबा दिला आणि अखेर २५ ऑगस्ट, १९९९ रोजी त्यांनी पारंपरिक पद्धतीने विवाह केला. त्यांच्या लग्नसोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Thalapthy Vijay- Sangeetha
Rashmika-Vijay Deverakonda| लग्नानंतर पहिल्यांदाच रश्मिका-विजय उदयपूर विमानतळावर स्पॉट, आभारही मानले

लग्नानंतर संगीता नेहमीच प्रकाशझोतात राहण्यापेक्षा कुटुंबाला प्राधान्य देताना दिसली. ती सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये क्वचितच दिसली. पण विजयच्या महत्त्वाच्या चित्रपटांच्या प्रीमियरला आणि कौटुंबिक कार्यक्रमांना ती हजर असायची. त्यांना दोन मुले आहेत - मुलगा जेसन संजय आणि मुलगी दिव्या साशा. संजयने 'वेट्टाईकारन' (२००९) मध्ये आपल्या वडिलांसोबत काम केले होते. तर मुलगी दिव्याने 'थेरी' (२०१६) मध्ये काम केलं होतं. जेसन लवकरच 'सिग्मा' चित्रपटातून दिग्दर्शनात डेब्यू करत आहे. तर दिव्या एक बॅडमिंटन खेळाडू आहे.

photo- tvk_vijay_squads instagram

‘Varisu' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च वेळी तिच अनुपस्थिती चर्चेचा विषय बनला. त्याचवेळी विजय-संगीता यांच्यातील दुराव्याची अफवा पसरली. पण नंतर एका कार्यक्रमात त्यांनी ही अफवा नाकारली. दुसरीकडे, असे म्हटले जाते की, संगीता लंडनला गेली आणि आपल्या दोन मुलांसह व्यवसाय सांभाळत आहे. रिपोर्टनुसार, तिची संपत्ती ४०० कोटींहून अधिक आहे.

विजयचे वडील एस ए चंद्रशेखर (S. A. Chandrasekhar) एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत, तर आई शोभा या गायिका आहेत.

२६ वर्षांचा संसार मोडण्याच्या मार्गावर?

संगीतासोरनलिंगमने लग्नाच्या २६ वर्षांनंतर तामिळनाडूतील चेंगलपट्टू कोर्टात अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, विजय त्याचा आगामी आणि शेवटचा चित्रपट Jana Nayagan च्या रिलीज प्रतीक्षेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news