Rashmika-Vijay Deverakonda| लग्नानंतर पहिल्यांदाच रश्मिका-विजय उदयपूर विमानतळावर स्पॉट, आभारही मानले

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Video | लग्नानंतर पहिल्यांदाच रश्मिका-विजय दिसले विमानतळावर, उदयपूरमध्ये फॅन्सच्या गर्दीत व्हिडिओ व्हायरल
Rashmika-Vijay Deverakonda
Rashmika-Vijay Deverakonda at Udaipur airportinstagram
Published on
Updated on
Summary

लग्नाच्या अफवांदरम्यान रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लग्नानंतर पहिल्यांदाच उदयपूर विमानतळावर एकत्र दिसले. चाहत्यांनी त्यांना पाहताच मोठी गर्दी केली असून त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rashmika Mandanna Vijay Deverakonda first public appearance at Udaipur airport

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी Rashmika Mandanna आणि Vijay Deverakonda पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काल २६ फेब्रुवारी रोजी दोघांनी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या. अखेर दोघे आयुष्यभराचे एकमेकांचे साथीदार झाले. हे दोघे नुकतेच उदयपूर (Udaipur) विमानतळावर एकत्र दिसले. यावेळी चाहत्यांनी त्यांना पाहताच मोठी गर्दी केली आणि मोबाईलमध्ये त्यांचे व्हिडिओ टिपले.

दरम्यान, रश्मिका-विजयने हात जोडून सर्वांना नमस्कार केले तसेच हात उंचावून अभिवादन केले. सोशल मीडियावर त्यांचे हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये रश्मिका आणि विजय साध्या कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहेत. दोघेही चाहत्यांना हासत अभिवादन करताना दिसताहेत. सुरक्षा रक्षकांच्या मदतीने दोघेही विमानतळाबाहेर पडताना दिसतात.

Rashmika-Vijay Deverakonda
Dipika Kakar Health | 'अजुनही वेदनादायी'; हालचाल करताना दीपिकाला सहन करायला लागताहेत या समस्या

नववधू रश्मिका मंदानाने - विजय दोघे हातात हात घालून, चेहऱ्यावर हास्य ठेवून पापराझींसाठीही थांबले. यावेळी त्यांनी फोटो पोझेज देखील दिल्या. रश्मिका-विजयने हात जोडून सर्वांचे आभार देखील मानले. रश्मिकाने फ्लाईंग किस देत फॅन्सची मने जिंकली.

रश्मिकाने लाल रंगाचा अनारकली सूट आणि गोल्डन बांगड्या घातल्या होत्या, मनगठावर पशुपु कोम्मालु (हळकुंड) बांधले होते. तर विजय सिल्वर कुर्ता आणि पायजमामध्ये डॅशिंग दिसला. त्याच्या गळ्यात सोन्याची चेन आणि डोळ्यावर गॉगल दिसला.

Rashmika-Vijay Deverakonda
Malamaal Weekly-2 |'मालामाल वीकली'चा सीक्वेल येतोय, रितेश देशमुख, परेश रावल, राजपाल यादव हास्याचा पाऊस पडणार

रश्मिका - विजयने २६ फेब्रुवारी, २०२६ रोजी उदयपूरमधील लक्झरी हॉटेलमध्ये विवाह केला. हे डेस्टिनेशन वेडिंग होते. या विवाह सोहळ्यात परिवार, जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. त्यांचे लग्न दोन वेगवेगळ्या पद्धतीने झाले. विजयच्या कुटुंबीयांचे तेलुगु तर रश्मिकाचे कोडवा (कूर्गी) रितीरिवाजाने लग्न पार पडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news