Thalapathy Vijay - sangeetha
wife sangeetha divorce file against Thalapathy Vijay instagram

Thalapathy Vijay divorce case | थलपति विजयच्या पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज दाखल, विवाहबाह्य संबंधाचा आरोप?

Thalapathy Vijay divorce case | थलपति विजयच्या पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज दाखल, विवाहबाह्य संबंधाचा आरोप?
Published on
Summary

थलपति विजय यांच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. काही ठिकाणी विवाहबाह्य संबंधांचे आरोपही करण्यात येत आहेत.

Thalapathy Vijay wife Sangeetha has filed for divorce in the Chengalpattu Family Court

घटस्फोट प्रकरणामुळे साऊथ स्टार थलपति विजय पुन्हा चर्चेत आला आहे. विजय थलापतीची पत्नी संगीता हिने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिने विजयचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. दोघे मागील दोन वर्षापासून वेगळे राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

दोघांनी १९९९ मध्ये लग्न केले होते. दरम्यान, थलपति विजय त्याचा आगामी आणि अखेरचा चित्रपट 'जन नायकन'च्या रिलीजमुळे चिंतेत आहे. आता त्याची पत्नी संगीता सोरनलिंगमने घटस्फोटासाठी केस केली आहे. तब्बल २७ वर्षांचे नाते संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

Thalapathy Vijay - sangeetha
Rashmika-Vijay Deverakonda| लग्नानंतर पहिल्यांदाच रश्मिका-विजय उदयपूर विमानतळावर स्पॉट, आभारही मानले

तिने अभिनेता विजयवर धोका दिल्याचा आरोप केला आहे. त्यांना दोन मुले जेशन संजय आणि दिव्य शशा आहेत. तिने याचिकेत विजय थलपतिवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. संगीताने चेंगलपट्टू कौटुंबिक कोर्टात घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज दाखल केलाय. याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की तिला २०२१ मध्ये कळले की, तिच्या पतीचे एका अभिनेत्रीसोबत संबंध आहेत. शिवाय, याचिकेत असे म्हटले आहे की विजयने नातेसंबंध संपवण्याबद्दल बोलले होते, परंतु तिने तसे करण्यास नकार दिला होता. तिने आपले नाते सुरू ठेवले.

एका वृत्तानुसार, संगीताने म्हटले आहे की थलापती विजय आणि पत्नी दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत. या आधारावर, तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. हा खटला चेंगलपट्टू कुटुंब कल्याण कोर्टात दाखल करण्यात आला आहे. पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे.

Thalapathy Vijay - sangeetha
Dipika Kakar Health | 'अजुनही वेदनादायी'; हालचाल करताना दीपिकाला सहन करायला लागताहेत या समस्या

२०२६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी अभिनेत्याने अभिनयातून निवृत्ती जाहीर केली होती आणि 'जन नायकन' हा त्यांचा अखेरचा चित्रपट असणार होता. पण, त्याचा चित्रपट रखडला आहे. या चित्रपटानंतर तो पूर्णपणे राजकारणात उतरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news