Thalapathy Vijay - Trisha | विजय - त्रिशा एकत्र : चाहत्‍यांकडून ‘अपडी पोडे’ गाणे व्हायरल, 20 वर्षांपूर्वीच्या आठवणींवर चाहते थिरकताहेत!

थलपथी विजय आणि त्रिशाच्या 'त्या' भेटीमुळे चाहते खूश , गाणे इन्टावर होतेय ट्रेन्ड
Thalapathy Vijay - Trisha
Thalapathy Vijay - Trisha
Published on
Updated on

Thalapathy Vijay - Trisha सध्या थलपती विजय याने चित्रपट कारकीर्दीला रामराम केला आहे. टीव्हिके पक्षातर्फे तो आता राजकारणात प्रवेश करत आहे. तसेच त्‍याचा शेवटचा चित्रपट ‘जन नायकन’ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्‍यामुळे सध्या थलापती विजय सध्या तामिळनाडूमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

त्‍यातच भाजप नेत्‍याने विजय व अभिनेत्री त्रिशा कृष्णण यांच्यावर वादग्रस्त टिपण्णी केली होती. त्‍याचीही चर्चा रंगली होती, विजय व त्‍याची पत्‍नी संगीता सोर्नालिंगम यांनी फेब्रुवारी २०२६ मध्ये चेन्नईजवळील चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात (Family Court) घटस्फोटासाठी अधिकृत याचिका दाखल केली आहे. तशातच एका लग्नाच्या कार्यक्रमात त्रिशा व विजय एकत्रच पोहचले. त्‍यामुळे या दोघांनी आपल्या नात्‍यावर शिक्कामोर्तब केले असल्याचा चर्चा रंगल्या आहेत.

Thalapathy Vijay - Trisha
Thalapathy Vijay divorce case | थलपति विजयच्या पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज दाखल, विवाहबाह्य संबंधाचा आरोप?

जोडी स्पॉट झाली व गाणे व्हायरल झाले

नुकतेच थलपथी विजय आणि त्रिशा एका खास कार्यक्रमात (फंक्शन) एकत्र स्पॉट झाले. बऱ्याच काळानंतर या जोडीला सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. या दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आजही तितकीच लोकप्रिय आहे, हे या भेटीने सिद्ध झाले. त्यांच्या या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वणव्यासारखे पसरले आणि चाहत्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या गाण्यांचे 'रील्स' बनवायला सुरुवात केली.

2004 मध्ये रिलीज झाले होते गाणे

'अप्पडी पोडे' हे गाणे २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गिल्ली' (Ghilli) या सुपरहिट तमिळ चित्रपटातील आहे. हा चित्रपट तेलगू चित्रपट 'ओक्कडू'चा रिमेक होता. 'गिल्ली'मधील विजय आणि त्रिशा यांची जोडी प्रचंड गाजली होती आणि हे गाणे त्यावेळी डान्स फ्लोअरवर धुमाकूळ घालत असे. आता ही जोडी रिअल लाईफमध्ये स्पॉट झाली आणि चाहत्‍यांच्या क्रिएटीव्हीटीला उधाण आले आहे. त्‍यामुळे 'अप्पडी पोडे' (Appadi Podu) हे गाणे पुन्हा एकदा ट्रेंड होत आहे.

Thalapathy Vijay - Trisha
Vijay Thalapathy | 'जन नायकन'ला हायकोर्टाकडून हिरवा कंदील, सेन्सॉर बोर्डाकडून मिळणार रिलीज सर्टिफिकेट

गाणे तामिळ असूनही गाणे लोकप्रिय

आजही हे गाणे ऐकले की अनेकांना नॉस्टेल्जीया येतो. हे गाणे तामिळ असूनही लोकांना त्‍याचे बिटस , शब्द, डान्स याचा फरफेक्ट संगम आवडतो. विजय व त्रिशा यांच्या सुरवातीच्या काळातील हे गाणे आहे पण आजही ते ऐकताना अनेकजण ताल धरतात. या गाण्याचे संगीत विद्यासागर यांनी दिले आहे. एकंदरीतच विजय याचे स्टारडमुळे २० वर्ष जुन्या गाण्याला पुन्हा 'चार्टबस्टर' बनवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news