Vijay Thalapathy | 'जन नायकन'ला हायकोर्टाकडून हिरवा कंदील, सेन्सॉर बोर्डाकडून मिळणार रिलीज सर्टिफिकेट
Vijay Thalapathy jana nayagan will release soon
प्रदर्शनासाठी परवानगीच्या अडचणीत सापडलेला थलपति विजयच्या चित्रपटाचा आता मार्ग मोकळा झाला आहे. हायकोर्टकडून त्याचा चित्रपट जन नायकनला प्रदर्शनासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
मद्रास हायकोर्टा ने शुक्रवारी सेन्सॉर बोर्डाला (CBFC) या चित्रपटाला U/A प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले. हा चित्रपट आधी शुक्रवार, ९ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु सेन्सॉर प्रमाणपत्र न मिळाल्याने तो पुढे ढकलावा लागला.
दरम्यान, गुरुवार, ७ जानेवारी रोजी, याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. त्यांच्या याचिकेत, निर्मात्यांनी 'UA १६' श्रेणी अंतर्गत या बहुप्रतीक्षित चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ला निर्देश देण्याची मागणी केली होती.
सुपरस्टार थलापति विजयच्या शेवटचा चित्रपट जन नायकनला रिलीजसाठी परवानगी न मिळाल्याने हा वाद मद्रास हायकोर्टापर्यंत पोहोचला होता. आता कोर्टाने सेन्सॉर बोर्डाला आदेश दिला की, चित्रपटाला तत्काळ सर्टिफिकेट देण्यात यावे. सर्टिफिकेट मिळण्यास उशीर झाल्याने ९ जानेवारी रिलीज होणार चित्रपट थांबवण्यात आला होता. आता कोर्टाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याने चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
राजकारणात पाऊल ठेवण्याआधी जन नायकन थलापति विजयचा अखेरचा चित्रपट असेल. त्यानंतर अभिनय इंडस्ट्रीतून तो निवृत्ती घेईल. आता फॅन्ससाठी नव्या रिलीज डेटची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
कोर्टाने स्पष्ट केलं की, चेअरपर्सनचे फिल्म रिव्ह्यू कमिटीकडे पाठवण्याचा अधिकार अवैध होता. कोर्टानुसार, जेव्हा चेअरपर्सनने समितीकडून म्हटलं की, यू/ए सर्टिफिकेट कटनंतर जारी केलं जाईल.

