TDM : ‘ख्वाडा’ – ‘बबन’च्या यशानंतर भाऊरावांचा ‘टीडीएम’

TDM
TDM
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित, आगळावेगळा विषय हाताळणाऱ्या 'टीडीएम'ची (TDM ) जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे. आता मात्र या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण येत्या २८ एप्रिल २०२३ ला हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. मात्र चित्रपटाच्या पोस्टरने ही उत्सुकता काही कमी होऊ दिलेली नाही. पुन्हा एकदा चित्रपटाचा संभ्रमात पाडणारा पोस्टर समोर आले आहे. चित्रपटात नेमकं कोण मुख्य भूमिकेत दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. लवकरच याचा उलगडाही होणार आहे. (TDM)

ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करणारे भाऊराव कऱ्हाडे 'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटाच्या यशानंतर कॉमेडी जॉनर घेऊन आले आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबत निर्मिती अशी दुहेरी धुरा त्यांनी पेलवली आहे.

वास्तविकतेचे दर्शन घडवणाऱ्या या चित्रपटाचा मुख्य नायकाचा चेहरा अद्याप प्रेक्षकांसमोर आलेला नाही. त्यामुळे चित्रपटात कोण कोण असणार याकडे नजरा लागून राहिल्या आहेत.

'चित्राक्ष फिल्म्स' आणि स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' चित्रपट आहे. कॉमेडी जॉनरच्या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा स्वतः भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्लेची जबाबदारी बी. देवकाते आणि भाऊरावांनी सांभाळली आहे. चित्रपटाला वैभव शिरोळे आणि ओमकारस्वरूप बागडे यांनी संगीत दिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news