गायक स्वप्नील बांदोडकर याचे नवं गाणं ‘सांग प्रिये’ पाहिलं का?

sang priye new song
sang priye new song

पुढारी ऑनलाईन डेस्क

गालावर खळी, राधा ही बावरी अशी उत्तमोत्तम गाणी गायलेल्या स्वप्नील बांदोडकर या गायकाचं नवं गाणं भेटीला आहे. सांग प्रिये असे या गाण्याचं नाव आहे. त्याने नव्या म्युझिक अल्बमसाठी आवाज दिला आहे. कोमल खिलारे आणि सोहम चांदवडकर ही नवी जोडी या गाण्यात झळकले आहेत.

कोमल ही डॉक्टर आहे तर सोहम हा पायलट आहे. दोघेही मॉडेल आहेत. साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष आणि सप्तसूर म्युझिकने या म्युझिक अल्बमची निर्मिती केली आहे. लीना कुलकर्णी यांनी गीतलेखन केलं आहे.

अमेय मुळे यांची संगीत रचना आहे. निखिल श्रीधर यांनी संगीत निर्मिती केली आहे. आजवर स्वप्निलने अनेक हिट गाणी गायलेली आहेत. प्रेमगीत ही स्वप्निलची खासियत आहे. सांग प्रिये हा म्युझिक अल्बमही प्रेमगीतच असल्यानं ते अतिशय उत्तमरीत्या हे गाणं गायलं आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news