Sunny Deol Jat 2| ‘लाहोर 1947’नंतर आणखी एक सरप्राईज, 'जाटला वर्ष पूर्ण होताच सनी देओलची जबरदस्त घोषणा

Sunny Deol Jat 2| 'जाटला वर्ष पूर्ण होताच सनी देओलने व्हिडिओ शेअर करत सीक्वेलची केली जबरदस्त घोषणा
Sunny Deol
Sunny Deol announced Jat 2pudhari photo
Published on
Updated on
Summary

सनी देओलने ‘जाट’ चित्रपटाच्या यशानंतर सिक्वेलची घोषणा केली आहे. ‘गदर 2’मुळे पुन्हा चर्चेत आलेल्या सनीचे ‘गबरू’ आणि ‘लाहोर 1947’ हे आगामी चित्रपट आधीच चर्चेत आहेत. आता ‘जात 2’मुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली असून लवकरच या चित्रपटाची पहिली झलक समोर येण्याची शक्यता आहे.

Sunny Deol Celebrates 'Jaat' Anniversary

बॉलिवूड स्टार सनी देओलने त्याच्या 'जाट' चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक व्ह्डिओ शेअर केला आहे. आता सनी देओलने चाहत्यांना दुसऱ्या भागाबद्दल अपडेट्स दिले असल्याची माहिती समोर आलीय. सनी देओलने Gadar 2 मधून दमदार पुनरागमन केल्यानंतर, तो आता पन्हा मोठा प्रोजेक्ट आणत आहे. ‘जाट’ आणि ‘बॉर्डर २’सारख्या चित्रपटांनंतर आता त्याचे आगामी ‘गबरू’ आणि Lahore 1947 यांचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Sunny Deol
Raja Shivaji Abhishek Bachchan role | २५ वर्षांची मैत्री आणि एक ऐतिहासिक स्वप्न! अभिषेक बच्चनने रितेश देशमुखसाठी केलं असं काही की...

दरम्यान, सनी देओलने चाहत्यांना आणखी एक मोठी सरप्राईज दिली आहे. त्याच्या ‘जाट’ या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत या चित्रपटाच्या सिक्वेलची अधिकृत घोषणा केली आहे. म्हणजेच, ‘जाट २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सनीचा दमदार ॲक्शन अवतार पुन्हा पाहायला मिळतो. त्याच्यासोबत रणदीप हुड्डा देखील झळकला आहे, ज्यामुळे सिक्वेलमध्येही जुनी जोडी धमाल करणार असे दिसत आहे. ‘जाट’च्या शूटिंगदरम्यानचा उत्साह, ॲक्शन आणि टीममधील केमिस्ट्री यांची आठवण करून देत सनीने हा प्रवास “अविस्मरणीय” असल्याचे म्हटले आहे. 'जाट' चित्रपटाची काही झलक शेअर केली आहे, त्यामध्ये तो हातात बंदूक घेऊन ॲक्शन करताना दिसत आहे.

Sunny Deol
Movie Raja Shivaji| स्वराज्याचा थरार आता डिजिटलवर! 'राजा शिवाजी' टीझर पाहून चाहते झाले भावूक; रितेशच्या दिग्दर्शनाची सर्वत्र चर्चा!

दिग्दर्शक गोपीचंद मॅलिनेनी यांचेही सनीने खास आभार मानले. त्यांच्या कल्पकतेमुळे ‘जाट’चे जग प्रभावीपणे उभे राहिल्याचे त्याने नमूद केले. तसेच सहकलाकार विनित कुमार सिंह यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही त्याने शेअर केला.

काय म्हणाला सनी देओल?

सनी देओलने लिहिले, "रणदीप हुडा आणि विनीत कुमार सिंग यांचेही अभिनंदन. तुमच्या दोघांसोबत स्क्रीन शेअर करणे खूप छान होते. आता, पुन्हा एकदा तयारी करण्याची वेळ आली आहे. 'जाट २' लवकरच येत आहे."

‘जाट’हा चित्रपट १० एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. अॅक्शनने भरलेल्या 'जाट'मध्ये रणदीप हुडाने रणतुंगाची खलनायकाची भूमिका साकारली होती. रणतुंगाच्या दहशतीचा अंत करण्यासाठी सनी देओलची एंट्री होते. चित्रपटाचे बजेट १०० कोटी होते आणि कलेक्शन १२०-१४० कोटींच्या दरम्यान होते. त्यामुळे आता आगामी ‘गबरू’, ‘लाहोर 1947’ आणि आता ‘जाट २’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय जादू दाखवणार, हे चित्रपट पाहिल्यानंतर कळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news