Raja Shivaji Abhishek Bachchan role | २५ वर्षांची मैत्री आणि एक ऐतिहासिक स्वप्न! अभिषेक बच्चनने रितेश देशमुखसाठी केलं असं काही की...

Raja Shivaji Abhishek Bachchan role | २५ वर्षांची मैत्री आणि एक ऐतिहासिक स्वप्न! अभिषेक बच्चनने रितेश देशमुखसाठी केलं असं काही की...
Abhishek Bachchan
Abhishek Bachchan character in the movie Raja Shivaji pudhari photo
Published on
Updated on
Summary

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिषेक बच्चन आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ या महाकाय ऐतिहासिक चित्रपटात अभिषेक बच्चन एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

रितेश देशमुखचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे स्वप्न असलेला 'राजा शिवाजी' हा चित्रपट आता सत्यात उतरत आहे. त्याला साथ लाभलीय ती म्हणजे त्याचा जवळचा मित्र अभिषेक बच्चन याची. अभिषेक या चित्रपटातून आपला दमदार डेब्यू करत आहे. आपल्या मित्राच्या स्वप्नपूर्तीसाठी अभिषेकने एक ऐतिहासिक भूमिका स्वीकारली आणि त्याच्या आणि रितेशच्या जुन्या मैत्रीबद्दलही सांगितले.

मैत्रीची सुरुवात लातूरमध्ये!

अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख यांची मैत्री २५ वर्षांपूर्वीची आहे. अभिषेकने सांगितले की, जेव्हा तो अजय देवगणसोबत 'जमीन' चित्रपटाचे शूटिंग लातूरमध्ये करत होता, तेव्हा रितेश त्यांना भेटायला आला होता. तिथूनच या मैत्रीच्या प्रवासाला सुरुवात झाली. पुढे 'ब्लफमास्टर' आणि 'हाऊसफुल्ल' सारख्या चित्रपटांमधून ही मैत्री अधिक घट्ट होत गेली. रितेशने जेव्हा आपल्या घरामध्ये अभिषेकसमोर 'राजा शिवाजी' बनवण्याचे स्वप्न सांगितले, तेव्हा अभिषेकने होकार दिला.

Abhishek Bachchan
Deool Band 2 | 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!' ११ वर्षांनंतर 'देऊळ बंद २' ची गर्जना; प्रविण तरडेंनी जाहीर केली तारीख

मैत्रीसाठी मराठीत पदार्पण!

अभिषेक बच्चन आजवर केवळ हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसला आहे. मात्र, रितेशच्या दिग्दर्शनांतर्गत बनत असलेल्या या चित्रपटासाठी त्याने पहिल्यांदाच हे पाऊल उचलले आहे. या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी शहाजीराजे भोसले यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी अभिषेकने मराठी उच्चार आणि ऐतिहासिक लहेजावर विशेष मेहनत घेतल्याचे सांगितले जाते. ३१ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या 'फर्स्ट लूक टीझर'ने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अभिषेक बच्चनचा योद्धा अवतार आणि रणांगणावरील त्याची उपस्थिती पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.

रितेशने कदाचित आजवरचा सर्वात महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपट साकारला आहे. एक दिग्दर्शक म्हणून त्याची क्षमता किती आहे, याबद्दल मला कोणतीही शंका नाही. तो असे काहीतरी निर्माण करणार आहे, जे मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक मैलाचा दगड ठरेल. या प्रकल्पाचा भाग होता आल्याबद्दल मला प्रचंड आनंद आहे आणि मला वाटते की हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण ठरेल.

- अभिषेक बच्चन, बॉलिवूड अभिनेता

कोण कोण असतील कलाकार?

अजय-अतुल यांचे संगीत, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांचे छायांकन आहे. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख आणि स्वतः रितेश देशमुख यांची भूमिका आहे.

कधी रिलीज होणार चित्रपट?

‘जिओ स्टुडिओज’द्वारे सादर करण्यात आलेला आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’च्या बॅनरखाली ज्योती देशपांडे व जिनिलिया देशमुख यांची निर्मिती आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Abhishek Bachchan
Pooja Sawant Movie | लग्नानंतर पूजा सावंतचा 'थ्रिलर' धमाका! 'सालबर्डी'मध्ये उलगडणार एका भयाण गावाचं रहस्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news