

movie raja shivaji teaser on digital platform
जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित राजा शिवाजी या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक टीझर’ अखेर डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. रणवीर सिंहच्या धुरंधर : द रिव्हेंज या चित्रपटासोबत चित्रपटगृहांमध्ये रिलीज करण्यात आला होता. या टीझरला थिएटरमध्ये टाळ्या आणि जल्लोषाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. सोशल मीडियावरही प्रेक्षकांनी टीझर बद्दल प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता हाच टीझर डिजिटल माध्यमातून रिलीज होतो आहे.
जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा फर्स्ट लूक टीझर आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला असून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका रितेश देशमुखने साकारली आहे. या चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी आहे. १ मे २०२६ रोजी हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये जागतिक स्तरावर रिलीज होतोय.
‘राजा शिवाजी’ची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे यातील तगडी स्टारकास्ट. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बमन ईरानी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी या बॅनरखाली ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख यांनी निर्मिती केली आहे.
प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी दिलेले अंगावर रोमांच उभे करणारे संगीत आणि प्रसिद्ध छायाचित्रकार संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट एका प्रेरणादायी कथा असून हा चित्रपट भाषेच्या सीमा ओलांडत जागतिक स्तरावर सादर करण्याचे निर्मात्यांचे उद्दिष्ट आहे.