Girija Prabhu : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ गौरीचं हटके फोटोशूट

Girija Prabhu : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ गौरीचं हटके फोटोशूट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं?' ही मालिकेतून गौरीचे पात्र चाहत्यांच्या घराघरात पोहोचले आहे. या मालिकेतील सर्वाची लाडकी गौरी म्हणजे, गिरीजा प्रभू ( Girija Prabhu ) होय. ही मालिका एका वेगळ्या वळणावर आली असून, यात गाैरीला मोलकरीण व्हावे लागले आहे. मालिकेत दिसणारी साधी सरळ गौरी खऱ्या आयुष्यात मात्र, ती खूपच सुंदर आहे.

नुकतेच गिरीजा प्रभूने ( Girija Prabhu ) आपल्या इंन्स्टाग्रामवर ट्रेडिशनल आणि ब्रायडल फोटोशूट केले आहे. या फोटोत तिने लाल- सोनेरी रंगाच्या घागरा आणि चोळी परिधान केली आहे. तिने हातात लाल रंगाच्या बंगड्यासोबत साजेशीर दागिने परिधान केले आहेत. या लूक गौरीच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे. यात ती खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे. या फोटोतील खास म्हणजे, तिच्या ड्रेसवरील डिझाईनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गौराच्या ड्रेसवर खूपच हेव्ही डिझाईन केलं आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी गौरीला नववर्षाचा शुभेच्छा दिल्या आहेत, यासोबत तिच्या ब्रायडल लूकला भरभरून कॉमेंन्टस केल्या आहेत. यात एकाने 'खूपच सुंदर', 'या वर्षी तुम्हचा नविन चित्रपट येत आहे का?' तर दुसऱ्या एकाने 'तुझ्या नजरेने घायाळ केलं', 'खूप खूप सुंदर दिसते आहे ताई तू' अशा कॉमेंन्टस दिल्या आहेत. याशिवाय तिसऱ्या एकाने 'खूपच सुंदर असून माझी जान. क्यूट गिरीजा.❤❤❤ ❤❤❤❤' असे लिहिले आहे. याशिवाय चाहत्यांनी हार्ट आणि फायरचा ईमोजी शेअर केला आहे.

गिरीजा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असून, आपले हटके फोटो शेअर करून चाहच्यांच्या संपर्कात राहत असते. याशिवाय सध्या तिची छोट्या पडद्यावर 'सुख म्हणजे नक्की काय असतं?' मालिका गाजत आहे. ही मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर येवून पोहोचली आहे.

या मालिकेत दादासाहेब गौरीला तिच्या वडिलांचा खून त्यांच्याच हातून चुकून झाल्याचे सांगतात. ते  घर सोडून जातात. ही गोष्ट गौरी माईला सांगते. परंतु, माईला दादासाहेबांवर गौरीने आरोप केल्यामुळे ते घर सोडून गेले असेच वाटते. या गोष्टीमुळे माई गौरीवर नाराज होवून तिला सून म्हणून स्वीकारण्यास नकार देतात. यामुळे गौरीला पुन्हा घरातील मोलकरणी व्हावे लागते.

या घटनेमुळे आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मालिकेत दादासाहेब घरी कधी येतील? आणि गौरीवर लागले आरोप कधी दूर होतील?. यांची ते आतुरतेने वाट पाहात आहेत. हे सर्व चाहत्यांना जानेवारी २०२२ मध्ये पाहायला मिळणार आहे.

 हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news